Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrpati Sambhajinagar: महसूल ६१ कोटी, सातारा-देवळाईत विशेष सवलतीनंतरही फक्त ८५ अर्ज; गुंठेवारीत ६ हजार ७७० संचिका मंजूर

झोन ५ मधून ९०२ अर्ज प्राप्त झाले असून महसूल ३.२१ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. झोन ६ मध्ये ६१७ अर्ज मंजूर झाल्याची नोंद असून या झोनमधून ३.१५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 13, 2025 | 05:37 PM
Revenue of 61 crore; only 85 applications received in Satara-Deolai despite special concessions

Revenue of 61 crore; only 85 applications received in Satara-Deolai despite special concessions

Follow Us
Close
Follow Us:
  • 1 एप्रिल ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान 8,324 अर्ज; 6,770 अर्जांना मंजुरी
  • गुंठेवारी मोहिमेतून एकूण ₹61.31 कोटींचा महसूल
  • सर्वाधिक 2,641 अर्ज मंजूर; ₹14.15 कोटी महसूल
Chhatrpati Sambhajinagar: शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या गुंठेवारी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८ हजार ३२४ संचिका दाखल झाल्या. यापैकी ६ हजार ७७० संचिकांना मंजूरी देत मनपाने ६१ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे.

मात्र सातारा-देवळाई परिसरासाठी लागू करण्यात आलेल्या विशेष सवलतीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प असून फक्त ८५ मालमत्ताधारकांनीच अर्ज दाखल केले आहेत. गुंठेवारी नोंदणीला आधीपासूनच प्रतिसाद असला तरी यावर्षी रेडीरेकनर दरात दिलेल्या २५ टक्के सवलतीमुळे अर्जाच्या संख्येत मोठी वाढ झाली. १ एप्रिल २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आलेल्या ८ हजार ३२४ संचिकांपैकी ६ हजार ७७० संचिकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण,

अर्ज व महसूलाबाबत झोननिहाय चित्र स्पष्ट

विविध झोनमधून प्राप्त झालेल्या अर्ज, मंजूर अर्ज आणि त्यातून मिळालेल्या महसुलाची माहिती समोर आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार बहुतांश झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज मंजूर झाले असून कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

झोन १ मधून ९५६ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ८३१ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या झोनमधून ५.०३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. झोन २ मध्ये १६ अर्जांपैकी १० अर्ज मंजूर झाले असून ०.१५ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला गेला आहे.

झोन ३ मधून १०३ अर्ज प्राप्त झाले, त्यातील ६९ अर्ज मंजूर करण्यात आले असून १.९२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. झोन ४ मध्ये सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले असून ३,०५३ अर्जांपैकी २,६४१ अर्ज मंजूर झाले आहेत. या झोनमधून १४.१५ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे.

झोन ५ मधून ९०२ अर्ज प्राप्त झाले असून महसूल ३.२१ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. झोन ६ मध्ये ६१७ अर्ज मंजूर झाल्याची नोंद असून या झोनमधून ३.१५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

झोन ७ मध्ये ४६० अर्ज प्राप्त झाले असून २८३ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या झोनमधून ५.०४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. झोन ८ मधून २,०१६ अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी १,४४२ अर्ज मंजूर झाले असून ६.३९ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला गेला आहे.

Winter Session: हिवाळी अधिवेशन संपत आले तरी लक्ष्यवेधी प्रश्न अनुत्तरितच; राहुल नार्वेकरांचा हक्कभंगाचा इशारा

झोन ९ मधून २९ अर्जांद्वारे ०.५१ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती आहे. झोन १० मध्ये ७९ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील ७८ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या झोनमधून ०.९२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

एकूणच, विविध झोनमधील अर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगाने सुरू असून त्यातून लक्षणीय महसूल प्राप्त होत असल्याचे चित्र या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

महसूल वाढीची नोंद पुढीलप्रमाणे

मागील वर्षी याच काळात ४८ कोटी ९४ लाखांचा महसूल जमा झाला होता.
यावर्षी जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यांत अर्ज व महसूल दोन्ही वाढले असून एकूण महसूल ६१ कोटी ३१ लाखांवर पोहोचला आहे.

सातारा-देवळाईत प्रतिसाद नाहीच

सातारा-देवळाई परिसराला प्रोत्साहन म्हणून महापालिकेने स्वतंत्र विशेष सवलत लागू केली होती.
मात्र अपेक्षेप्रमाणे नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही.
सवलत असूनही फक्त ८५ मालमत्ताधारकांनीच अर्ज दाखल केले असल्याचे गुंठेवारी विभागाने स्पष्ट केले,

सवलत फक्त डिसेंबरपर्यंत

गुंठेवारीसाठी असलेली २५ टक्के सवलत डिसेंबरअखेरीपर्यंत लागू आहे.
त्यामुळे अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संचिका वेळेत पूर्ण कराव्यात, असे आवाहन मनपाने केले आहे.

Web Title: Revenue of 61 crore only 85 applications received in satara deolai despite special concessions 6770 files approved under the gunthewari scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा
1

लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीने बेडरूमचा दरवाजा ठोठावला पण नंतर…
2

गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीने बेडरूमचा दरवाजा ठोठावला पण नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.