जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या असाच एक धोकादायक बाईक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बाईकवर ६ जण प्रवास करत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, मोठ्या गाड्यांचे ट्राफिक आहे. अशा परिस्थितीत या हिरोबाजांनी यमराजाला आवाहन देण्यासारखे काम केले आहे. या लोकांना ना स्वत:च्या जीवाची पर्वा आहे ना आपल्या आसपासच्या लोकांची. चुकूनही एखादा मागे गाडीवरुन खाली पडला, किंवा बाईक चालवणाऱ्याचा तोल गेला तर कितपत महागात पडू शकते हे या लोकांना समजत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
व्हायरल व्हिडिओ
बाइक पर 6 बैठे दिख है, एक 7 वां भी बैठा है जो ना हमें दिख रहा ना इन बाइक वालों को दिख रहा.. वो है महाराज यमराज। इन अज्ञानियों को नहीं पता कि वो यम हैं
झट से पटकेंगे और पट से उठा ले जाएंगे।😅 pic.twitter.com/BgnAMuOOe0 — चौधरी साब (@dcchoudhary197) December 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dcchoudhary197 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे. एका युजरेन यांच्याकडून असा दंड वसूल करा की परत असे करायचा विचाप करणार नाहीत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने यमराज दादा ह्यांचा काका आहे वाटतं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफावन व्हायरल होत आहे.
धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्… पुढं जे घडलं भयंकर, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






