Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Revenue Department: ‘उत्पादन’ शुल्क विभागाकडून ३ हजार कोटींचा महसूल जमा

जिल्ह्यात सन २०२४-२५ आर्थिक वर्षांत ५ हजार ९९५ गुन्हे नोंदविण्यात आले असून, ५ हजार ८९१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ६२१ वाहनासह २५ कोटी ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 12, 2025 | 08:39 AM
Revenue Department: ‘उत्पादन’ शुल्क विभागाकडून ३ हजार कोटींचा महसूल जमा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/बारामती:  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात महसूली उत्पन्न, गुन्हे अन्वेषण तसेच अनुज्ञप्त्यांवर कारवाईच्या बाबतीत गतवर्षीपेक्षा भरीव कामगिरी केली आहे. या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षात २ हजार ९९८ कोटी ३३ लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे. सन २०२३- २४ च्या २ हजार ७२९ कोटी ४४ लाख रुपयांच्या तुलनेत महसुलात ९.८५ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

जिल्ह्यात सन २०२४-२५ आर्थिक वर्षांत ५ हजार ९९५ गुन्हे नोंदविण्यात आले असून, ५ हजार ८९१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ६२१ वाहनासह २५ कोटी ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५७७ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे २९९ बंधपत्र घेण्यात आले असून, रक्कम २ कोटी १८ लाख रुपये रकमेची बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला; गावच्या जत्रेतच केलं लक्ष्य

एमपीडीए कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या एकूण ९ प्रस्तावांपैकी १ प्रकरणात सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुज्ञप्तीचे वारंवार सखोल तपासणी करुन नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधिताविरुद्ध कठोर  कारवाई येत आहे. सन २०२४-२५ वर्षात एकूण ५६९ अनुज्ञप्तीविरुद्ध विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ४ अनुज्ञप्ती कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. या विभागीय विसंगती प्रकरणात १ कोटी ८६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार धाब्यांवर अवैध मद्य विक्री करणाऱ्याविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मा सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध एकूण ४५५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये १ हजार २५० आरोपीना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाद्वारे आरोपींना एकुण ८ लाख १९ हजार रुपये आर्थिक दंड ठोठविण्यात आलेला आहे. यामुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई न करता त्यासोबत या ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरुध्द सुध्दा कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांनादेखील चाप बसणार आहे.

Pune News: वारजे दुर्घटनेप्रकरणी चाळ मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; वडील,मुलाचा झाला होता मृत्यू

संपर्क साधण्याचे आवाहन

देशको राजे उत्पादन डॉ. विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अवैध मद्य निर्मिती, विकी, वाहतूक तसेच परराज्यातील मद्य, अवैध ढाबे, अवैध ताडी, विक्री विरुद्ध २१ पथकांमार्फत कठोर करण्यात येत आहे. नागरिकांना मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.

Web Title: Revenue of rs 3000 crores collected from production duty department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • Revenue Department

संबंधित बातम्या

Jaykumar Gore: “लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या…”; मंत्री जयकुमार गोरेंच्या विभागीय आयुक्तांना सूचना
1

Jaykumar Gore: “लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या…”; मंत्री जयकुमार गोरेंच्या विभागीय आयुक्तांना सूचना

Devendra Fadnavis: “महसूल विभाग राज्यातील जनतेला…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
2

Devendra Fadnavis: “महसूल विभाग राज्यातील जनतेला…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात
3

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात

Ajit pawar: “चक्की पिसिंगसाठी मोक्काखाली…”; अजित पवारांनी कोणाला दिला थेट इशारा?
4

Ajit pawar: “चक्की पिसिंगसाठी मोक्काखाली…”; अजित पवारांनी कोणाला दिला थेट इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.