वारजे दुर्घटनेप्रकरणी चाळ मालकावर गुन्हा (फोटो- सोशल मिडिया)
दरम्यान ९ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुडावत राहत असलेल्या पत्र्याच्या खोलीत शाॅर्टसर्किट झाले. प्रकाश डिलिव्हरी बॉयचुरे काम करत असल्याने तो रात्रपाळीत कामाला गेला होता. शाॅर्टसर्किट झाल्यानंतर खोलीत आग लागली. आग लागल्यानंतर त्यांना बाहेर पडता आले नाही. ते बाथरूममध्ये जाऊन लपटले. पण, आगीत सिलिंडरने पेट घेतला आणि त्याचा स्फोट झाला. यात प्रकाशचे वडील मोहन आणि भाऊ पप्पू गंभीर होरपळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पुण्यातील वारजेत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; संपूर्ण घर जळून खाक, दोघांचा मृत्यू
या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली. तेव्हा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचे उघडकीस आले. पत्र्याच्या खोलीत खिडकी नव्हती, तसेच बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा होता. पुरेशी काळजी न घेतल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चाळ मालक नितीन बराटेवर सदोष मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल केला. सहायक निरीक्षक रणजीत मोहिते तपास करत आहेत.