Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi language: ‘मराठी शिकण्यासाठी’ रिक्षाचालकांकडून ३०० रुपये? आनंद दिघेंच्या नावाचा वापर केल्याचा आरोप

Marathi language:  महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आल्यानंतर रिक्षाचालकांकडून कथित ३०० रुपये वसूल केल्याचा आरोप समोर आला आहे. रिक्षा युनियनमार्फत ही रक्कम घेतली जात असल्याचा दावा असून, या प्रक्रियेत दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा वापर केल्यानेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2026 | 06:32 PM
‘मराठी शिकण्यासाठी’ रिक्षाचालकांकडून ३०० रुपये? आनंद दिघेंच्या नावाचा वापर केल्याचा आरोप

‘मराठी शिकण्यासाठी’ रिक्षाचालकांकडून ३०० रुपये? आनंद दिघेंच्या नावाचा वापर केल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • ‘मराठी शिकण्यासाठी’ रिक्षाचालकांकडून ३०० रुपये?
  • आनंद दिघेंच्या नावाचा वापर केल्याचा आरोप
  • मराठीच्या नावाखाली रिक्षाचालकांकडून पैसे घेतल्याचा आरोप
विजय काते, मिरा-भाईंदर : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान महत्त्वाचे करण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा घेत काही पदाधिकारी रिक्षाचालकांकडून कथितपणे आर्थिक वसुली करत असल्याचा आरोप पुढे आला आहे.

शिवसेनेचे नेते व पदाधिकारी जयराम मेसे यांच्या माध्यमातून रिक्षा युनियनमार्फत प्रत्येक रिक्षाचालकाकडून ३०० रुपये घेऊन फॉर्म भरून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी ज्या संस्थेच्या नावाचा वापर केला जात आहे, तिची नोंदणी, अधिकृत मान्यता किंवा पैसे घेण्याचा अधिकार याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश

याहून गंभीर बाब म्हणजे या उपक्रमासाठी धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करून रिक्षाचालकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे दिघे यांच्या नावाचा वापर करून आर्थिक व्यवहार केला जात असेल, तर त्यामागील संस्था नेमकी कोणती, तिची कायदेशीर नोंदणी आहे का आणि जमा होणाऱ्या पैशांचा हिशेब कुठे ठेवला जातो, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मराठी भाषेचे ज्ञान रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आवश्यक करण्यामागे प्रवाशांशी सुसंवाद वाढवणे आणि महाराष्ट्रातील भाषिक व्यवहार अधिक सक्षम करणे हा उद्देश आहे. मात्र, या निर्णयाच्या नावाखाली रिक्षाचालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्यास त्याची अधिकृत पावती, शुल्क निश्चित करणारा शासन आदेश आणि संबंधित संस्थेची नोंदणी याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे.

रिक्षाचालकांकडून ३०० रुपये नेमक्या कोणत्या कारणासाठी घेतले जात आहेत, त्याची पावती दिली जाते का, संबंधित संस्थेला परिवहन विभागाची मान्यता आहे का आणि आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करण्यास परवानगी आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या आरोपांबाबत जयराम मेसे तसेच संबंधित रिक्षा युनियनची अधिकृत बाजू समोर आलेली नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

Mumbai One App: मेट्रो, लोकल, बससेवा एका ॲपवर; ‘मुंबई वन’वर १.०४ कोटींहून अधिक तिकिटांचे बुकिंग

Web Title: Rickshaw drivers charged rs 300 in name of marathi language thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Auto
  • maharashtra
  • Marathi Language

संबंधित बातम्या

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात
1

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी
2

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट
3

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
4

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.