Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट! पुणे-नांदेड प्रवासासाठी 2 ते 3 हजारांचा भुर्दंड; RTO अधिकारी नेमके कुठे?

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली असताना खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचे दर तब्बल २ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत आकारले जात असल्याने प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2026 | 02:05 PM
दिवाळीत ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट! पुणे-नांदेड प्रवासासाठी 2 ते 3 हजारांचा भुर्दंड; RTO अधिकारी नेमके कुठे?

दिवाळीत ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट! पुणे-नांदेड प्रवासासाठी 2 ते 3 हजारांचा भुर्दंड; RTO अधिकारी नेमके कुठे?

Follow Us
Follow Us:
  • पुणे-नांदेड ट्रॅव्हल्सचे भाडे २ ते ३ हजारांवर
  • निकृष्ट जेवण आणि असुरक्षित प्रवासामुळे प्रवासी त्रस्त
  • विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी
नांदेड : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली असताना रेल्वेचे तत्काळ तिकीटही मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, प्रवाशांच्या या अगतिकतेचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचे दर तब्बल २ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत आकारले जात असल्याने प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. पुण्याहून नांदेडकडे येताना शिरूरच्या पुढे एका ठिकाणी ट्रॅव्हल्स थांबविण्यात येते. तेथील हॉटेलमध्ये प्रवाशांची अक्षरशः जत्राच भरते. मात्र, एवढी गर्दी असूनही जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने प्रवाशांना नाईलाजानेच जेवण उरकावे लागते.

 

जादा भाडे, निकृष्ट भोजन अन् असुरक्षित प्रवास

प्रवाशांकडून भरमसाठ पैसे आकारायचे आणि त्या बदल्यात साध्या दर्जाचे जेवणही उपलब्ध करून द्यायचे नाही, असा प्रकार सुरू असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांना अक्षरशः कडबा भरल्याप्रमाणे कोंबून नेतात. प्रवाशांची संख्या, प्रवासातील सुरक्षितता आणि सुविधांपेक्षा अधिकाधिक प्रवासी वाहून नेण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते. तिकिटांचे वाढीव दर, निकृष्ट भोजन आणि असुविधाजनक प्रवास अशा तिहेरी संकटाचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. प्रवाशांसमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचे अव्वाच्या सव्वा दरही स्वीकारावे लागत आहेत. पुणे-नांदेड मार्गावर किमान आठ दिवस विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या असत्या, तर प्रवाशांची एवढी गर्दी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळली नसती.

हे सुद्धा वाचा : ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले

अधिकारी लक्ष देणार का ?

प्रादेशिक परिवहन विभागाचे नांदेडला चार जिल्ह्याचे कार्यालय आहे. साळी नावाचे कुणी अधिकारी आहेत. त्यांच्या दिमतीला अन्य अधिकाऱ्यांचा फौजफाटा आहे. हे अधिकारी नेमके काय करतात? त्यांची जबाबदारी काय? हे त्यांनाच माहित. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे.

भाडेवाढीचा फटका आणि त्यांची आर्थिक पिळवणूकही टळली असती. सणासुदीला गावी जाण्याचा आनंद घ्यायचा की प्रवासातील लूट आणि गैरसोयी सहन करायच्या? असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवाशांसमोर उभा राहिला आहे. रेल्वे प्रशासनाने भविष्यातील गर्दीचा अंदाज घेऊन विशेष गाड्यांचे नियोजन करावे, तसेच खासगी प्रवासी वाहतुकीतील मनमानी दर आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि परिवहन विभागाने समन्वय साधून तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे-नांदेड मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे किती आकारले जात आहे?

    Ans: दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांना २ ते ३ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जात असल्याची तक्रार आहे.

  • Que: खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना प्रवाशांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे?

    Ans: जादा तिकीट दर, निकृष्ट दर्जाचे जेवण, ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि असुविधाजनक प्रवास अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.

  • Que: प्रवाशांनी प्रशासनाकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत?

    Ans: पुणे-नांदेड मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीवर नियंत्रण ठेवावे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: During diwali passengers are being fleeced by private bus driver nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nanded
  • Travel Bus

संबंधित बातम्या

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
1

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर
2

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…
3

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!
4

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.