Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात तापमानात होतेय मोठी वाढ; नंदुरबार सर्वाधिक उष्ण, तापमानाचा पारा 41.5 अंशांवर

मुंबईतील काही ठिकाणी कमाल तापमानाने ३७ ते जवळपास ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदींनुसार विक्रोळी येथे ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 14, 2026 | 08:34 AM
देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमानाने ३८ ते ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, नंदुरबार येथे राज्यातील सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहिले. सोलापूर येथे ४०.१ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे ४०.० अंश सेल्सिअस, ठाणे-बेलापूर औद्योगिक परिसरात ३९.८ अंश सेल्सिअस, जळगाव येथे ३९.४ अंश सेल्सिअस, परभणी येथे ३९.३ अंश सेल्सिअस अशी उष्णतेची तीव्रता नोंदवली गेली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे ३८.८ अंश सेल्सिअस, सातारा ३८.२ अंश सेल्सिअस, अहमदनगर ३८.१ अंश सेल्सिअस, उदगीर ३८.० अंश सेल्सिअस, नाशिक ३७.८ अंश सेल्सिअस, पुणे ३७.८ अंश सेल्सिअस, सांगली ३७.८ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदले गेले.

हेदेखील वाचा : पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; डोंगराळ भागांत बर्फवृष्टीचा अंदाज तर…

दरम्यान, मुंबईतही उष्णतेची झळ कायम असून, सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३७.० अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. फाल्गुन महिना सुरू असून मुंबईत उन्हाचा चटका वाढत आहे. शहरातील तापमानाचा पारा काही केल्या खाली येत नसल्याचे चित्र आहे.

मुंबईकरांना उन्हाचा चटका

शुक्रवारी मुंबईतील काही ठिकाणी कमाल तापमानाने ३७ ते जवळपास ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदींनुसार विक्रोळी येथे ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, शहरातील हा सर्वाधिक पारा ठरला. त्यामुळे ‘फाल्गुनदाह’ अनुभवावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विक्रोळीपाठोपाठ राम मंदिर परिसरात ३८.६ अंश, विद्याविहारमध्ये ३७.९ अंश, टाटा पॉवर चेंबूर येथे ३७.१ अंश सेल्सिअस नोंद झाली.

आरोग्याची काळजी घ्याच 

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी पिणे, थेट उन्हात जास्त वेळ राहणे टाळणे आणि प्रकृती बिघडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Rise in temperatures across maharashtra nandurbar hottest in state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • Climate Change
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…
1

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
2

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार

पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
3

पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कायम! कुठे, कोणता अलर्ट? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज?
4

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कायम! कुठे, कोणता अलर्ट? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.