जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) एका नवीन अहवालानुसार, २०२५ ते २०२९ दरम्यान पृथ्वीचे सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक युगाच्या (१८५०-१९००) तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असण्याची ७० टक्के शक्यता आहे.
महाराष्ट्रातील जनतेला ताळपल्या सुर्याने अक्षरशः हैरान केले आहे. साताऱ्यामध्ये देखील बेसुमार वृक्षतोड आणि नियोजनशून्य प्रशासन यामुळे प्रदूषण वाढीला लागून तापमान वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.
नागरिकांना घराच्या बाहेर पडणे काठीण झाले होते. चाकरमान्यांनी सकाळी ऑफीसमध्ये गेल्यानंतर बाहेर पडणे टाळले. गेल्या आठवडाभरापासून शहरातील मुख्य रस्त्यांवर संचारबंदीसारखी परिस्थिती दिसत आहे.
राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्यावर तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. उष्णतेचा इशारा असूनही मुंबईत तापमान तुलनेने कमी होते.
मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद सोमवारी झाली.