Rising temperatures have led to water shortages and increased demand for water tankers.
पिंपरी : राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. मे महिना सुरु होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी पाणीटंचाई भासू लागली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली आहे. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाण्याच्या तक्रारी येत आहेत. धरणातून पाणी मुबलक मिळत आहे. परंतु, महापालिकेला पाणी वितरणाचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत आहे. टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्या, टँकर माफियांना पोसण्यासाठी कृत्रिम पाणी टंचाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शहरातील पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण, अतिक्रमण अशा विविध कामाचा आढावा घेतला. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, उपायुक्त सचिन पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यावेळी उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बैठकीनंतर खासदार बारणे यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार बारणे म्हणाले, थेरगाव, दापोडी, काळेवाडी, किवळे, वाल्हेकरवाडीसह शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विस्कळीत, अपुरा, अवेळी तक्रारींमध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्र मोठी वाढ झाली आहे. तक्रारी निकाली काढाव्यात. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत करावा. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू देऊ नका, नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे नागरिकाना पिया रावेत बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. शिवणे बंधा-यातून पाणी उचलण्याबाबत चाचपणी करावी.
पवना, इंद्रायणी नदी सुधारचे काम हाती घ्यावे. लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहू, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) (एसटीपी) कार कार्यान्वित करावेत. इंद्रायणीनदी लगत असलेल्या ३८ आणि पवना नदी काठच्या १८ गावात एसटीपी उभारले जाणार आहेत. इंद्रायणीसाठी ६७१ कोटी तर पवनासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याची कार्यवाही पीएमआरडीएने सुरु करावी. नदी स्वच्छतेसाठी तत्काळ पाऊले उचलावीत. याबाबत मी देखील पाठपुरावा करत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा खासदार बारणे यांनी बैठकीत आढावा घेतला. आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळमधील कोथुर्णे, काळे कॉलनी, दारुंबे-लोहार वस्ती-साळुंब्रे ते चांदखेड हा रस्ता, सांगवडे ते नेरे, सांगवडे ते संत तुकाराम साखर कारखाना दरम्यानचा रस्ता, ब्राम्होणली या रस्त्यांची कामे पूर्णात्वाकडे आली आहेत. शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत.