Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीपूर्वीच बलाढ्य महायुतीला तडा; महादेव जानकरांनी केला रामराम; ‘या’ कारणामुळे होते नाराज

महादेव जानकर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2024 | 01:33 PM
निवडणुकीपूर्वीच बलाढ्य महायुतीला तडा; महादेव जानकरांनी केला रामराम; 'या' कारणामुळे होते नाराज

निवडणुकीपूर्वीच बलाढ्य महायुतीला तडा; महादेव जानकरांनी केला रामराम; 'या' कारणामुळे होते नाराज

Follow Us
Follow Us:

मुंबई: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महायुतीला मोठा फटका बसला आहे. कारण महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे टेंशन वाढले आहे.

निवडणुकीपूर्वी महायुतील मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुती कमकुवत होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर ही राज्यातील सर्वच २८८ जागा लढवण्यावर ठाम आहेत. २८८ उमेदवार उभे करण्यावर महादेव जानकर  ठाम आहेत. महादेव जानकर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. जागावाटपाच्या चर्चेत आपल्याला विचारात घेतले जात नसल्याच्या कारणांमुळे जानकर यांनी महायुतीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

महादेव जानकर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले होते. मात्र जागावाटप करताना विचारात घेत नसल्याने जानकर यांनी महायुती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महादेव जानकर याच्या पक्षाची ताकद आहे. तसेच धनगर समाज मोठ्या प्रमाणात जानकर यांच्या मागे आहे. त्यामुळे जानकर यांनी साथ सोडणे महायुतीला धोकादायक ठरणार आहे. जातीय आणि राजकीय समीकरण पाहता भाजप आणि महायुतीला जानकर यांची मनधरणी करण्यात यशस्वी होते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

भाजपचे पहिले १० मतदारसंघ ठरले?

भाजपने २५ जागांवर उमेदवार निश्चित केल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार सध्याच्या विद्यमान सरकारमधील काही मंत्र्यांना डावलण्यात आल्याचे समजते आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते आहे. भाजपने निश्चित केलेल्या २५ जणांच्या यादीत फडणवीस आणि पाटील यांचे नाव असल्याचे समजते आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पुण्यातील कोथरूड मंतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी बाकी राहीला आहे. भाजपने पहिल्या यादीतून काही विद्यमान मंत्र्यांना वगळल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपापल्या मतदारसंघात प्रचार आणि सभा घेऊन मतदारांना आवाहन करण्यासाठी उमेदवारांकडे फारच कमी कालावधी राहणार आहे.

Web Title: Rsp chief mahadev jankar left mahayuti before maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 06:23 PM

Topics:  

  • Mahadev Jankar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
1

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.