मराठी-हिंदी भाषा वादात RSS ची भूमिका काय? सुनील आंबेकर म्हणाले, "त्याच भाषेत प्राथमिक..."
Sunil Ambekar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाषा वाद सुरू झाला आहे. विरोधक सरकारवर टीका करत आहे. पाहिलीपासून हिंदी सक्तीबाबतचा जीआर फडणवीस सरकारने मागे घेतला आहे. त्यानंतर ठाकरे बंधू यांनी मोर्चा रद्द करून विजयी मेळावा घेतला. कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार असा इशारा ठाकरे बंधुनी दिला आहे. दरम्यान आता या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. विविध राज्यांमध्ये सुरू असलेला भाषावाद याबाबत सुनील आंबेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले माध्यम प्रमुख सुनील आंबेकर?
आपल्या देशातील सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. लोक ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणची भाषा ते बोलत असतात. त्यामुळे त्याच भाषेत प्राथमिक शिक्षण घ्यायला हवे. हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे.
VIDEO | Delhi: RSS leaders Sunil Ambekar and Anil Agarwal addressed a joint press conference earlier today. On the language row, Sunil Ambekar said, “RSS has always maintained that all Indian languages are national languages. People speak the language prevalent in their region,… pic.twitter.com/rRUqqiiYWG — Press Trust of India (@PTI_News) July 7, 2025
महाराष्ट्रातील हिंदी-मराठी वादावर राजस्थानच्या माजी CM ची प्रतिक्रिया
महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी आधी अनिवार्य आणि त्यानंतर पर्यायी म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन जोरदार वाद निर्माण झाला. मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावरुन जोरदार विरोध केला. यावरुन राजकीय गदारोळ झाल्यानंतर राज्य सरकारने दोन्ही जीआर रद्द केले. यावर आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री मराठी-हिंदी वादावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या नेत्यांना सल्ला देखील दिला आहे. अप्रत्यक्षपणे उद्धव आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
जयपूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भारत हा विविधतेने भरलेला देश आहे, जिथे भाषा, धर्म आणि संस्कृतीशी संबंधित प्रश्न वेळोवेळी उद्भवत राहतात. पण हे वाद काही नवीन किंवा मोठी गोष्ट नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की अशा सामाजिक समस्यांमधूनही उपाय निघतात आणि देश पुढे जातो.” असे मत त्यांनी व्यक्त केले. भारताची सर्वात मोठी ताकद त्याची विविधता आहे. येथे एकता तेव्हाच मजबूत होते जेव्हा लोकांना त्यांच्यातील मतभेद असूनही एकत्र कसे राहायचे हे माहित असते. त्यांनी मराठी-हिंदी वादाला फार गंभीर मानले नाही आणि असे म्हटले की अशा चर्चा होत राहतात.