मुंबई: राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी आंदोलने केली जात आहे. मात्र आता हा मुद्दा मुंबई हायकोर्टात जाऊन पोहोचला आहे. औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली आहे.
औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकाच्या व्याख्येत बसत नाही, त्यातून पुढच्या पिढीला घेण्यासारखे काहीही नाही त्यामुळे ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी मुंबई हायकोर्टात या याचिकेतून करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. औरंगजेबाची कबर पुरातत्व विभगाच्या यादीतून वगळली की ती कबर कायमची हटवून टाकावी. जेणेकरून भविष्यात यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही असे या याचिकेत सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला?
सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील औरंग्याच्या कबरीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तर ASI नं कबरींचं संरक्षण करायला सांगणे हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मात्र कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर त्याचा तिथेच चिरडून टाकू असा इशाराही दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतो. हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय रामाचे दर्शन पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे शिवरायांचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही देवाचे दर्शन होत नाही. जिजाऊंनी त्या काळात देव, देश, धर्मासाठी रयतेचे राज्य झाले पाहीजे म्हणून शिवरायांना घडवले. श्री राम युगपुरुष होते. शिवरायांना 18 पघड जातींना एकत्र केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष निर्माण केलं . महाराजांनी या मातीत एक अंगार फुलवला . औरंगजेबला याच मातीत गाडला आहे.
महाराष्ट्रात जशी शिवभक्तांची भावना आहे, जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझीही भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केलीय. त्यामुळे क्रूरकर्मा औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादाच्या अनुषंगाने शिंदेंनी भाष्य केलंय . तसेच शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. दरम्यान, जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये असं म्हणन त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे.