"महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला? जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर तिथेच चिरडून टाकू", देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल (फोटो सौजन्य-X)
सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. जरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे.यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील औरंग्याच्या कबरीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तर ESIनं कबरींचं संरक्षण करायला सांगणे हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.मात्र कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर त्याचा तिथेच चिरडून टाकू असा इशाराही दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतो. हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय रामाचे दर्शन पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे शिवरायांचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही देवाचे दर्शन होत नाही. जिजाऊंनी त्या काळात देव, देश, धर्मासाठी रयतेचे राज्य झाले पाहीजे म्हणून शिवरायांना घडवले. श्री राम युगपुरुष होते. शिवरायांना 18 पघड जातींना एकत्र केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष निर्माण केलं . महाराजांनी या मातीत एक अंगार फुलवला . औरंगजेबला याच मातीत गाडला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एकसंघ, एकोपाने राहाणार महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित आहे. शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वरचा वाडा सुद्धा विकासासाठी घेत आहेत. आग्रामध्ये ज्या किल्ल्यांत महाराजांना ठेवले होते ते विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी केली आहे. या मंदिराच्या स्थळाला तीर्थस्थळाचा दर्जा तात्काळ दिला जाईल . पीडब्युला तात्काळ सांगतो की इथे चांगले रस्ते करावेत.
महाराष्ट्रात जशी शिवभक्तांची भावना आहे, जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझीही भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केलीय. त्यामुळे क्रूरकर्मा औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादाच्या अनुषंगाने शिंदेंनी भाष्य केलंय . तसेच शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. दरम्यान, जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये असं म्हणन त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे.