Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर RTO ची कडक कारवाई; लाखोंचा दंड वसूल

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ मध्ये या दहा महिन्यात ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १ हजार २४१ जणांवर दंडात्मक कारवाई करत १२ लाख ४१ हजार रूपये दंड वसूल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 22, 2026 | 12:49 PM
डीजेच्या दणदणाटामागे जुन्या वाहनांचा धोकादायक खेळ? आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष

डीजेच्या दणदणाटामागे जुन्या वाहनांचा धोकादायक खेळ? आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागते. मात्र, या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातच आता प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ मध्ये या दहा महिन्यात ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १ हजार २४१ जणांवर दंडात्मक कारवाई करत १२ लाख ४१ हजार रूपये दंड वसूल करण्यात आले. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करणे बेकायदेशी आहे. त्यानुसारच या बेशिस्त ट्रिपल सीट वाहन चालकांवर प्रत्येकी १ हजार रूपये दंड आकारण्यात आले.

हेदेखील वाचा : Maharashtra Transport E-Challan: RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता

पुणे शहरातील वाहतूक सर्वात जास्त बेशिस्त वाहतूक असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी आरटीओकडून अशी कारवाई करण्यात येते. रस्त्याने जाताना सर्रासपणे दुचाकीस्वार ट्रिपल सीट वाहन चालवत असतात. यातून तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता जास्त असते. सध्या मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून देखील म्हणावी तसी सुधारणा दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन करणे, हाच यावर प्रभावी उपाय असल्याचे वाहतूक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, काही वाहनचालक अद्यापही सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसतात.

दरम्यान, वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यावर वेळोवेळी आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु या दंडात्मक कारवाईचा उद्देश महसूल मिळवणे नसून प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी ट्रिपल सीट वाहन चालवणे टाळावे. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षितेला प्राधान्य द्यावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारीस्वप्निल भोसले यांनी सांगितले.

ट्रिपल सीट प्रवास केल्यास दंड

ट्रिपल सीट प्रवास केल्यास १००० चा दंड होतो. मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार हा गुन्हा दाखल होऊ शकतो. दंड भरण्याव्यतिरिक्त, आरटीओ गाडी जप्त करू शकतात किंवा लायसन्स जप्त करू शकतात. चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे, अन्यथा अतिरिक्त दंड लागू शकतो. दुचाकीचे संतुलन बिघडू नये आणि अपघात टळावेत, म्हणून हा नियम कडक करण्यात आला आहे.

Web Title: Rto takes strict action against triple riding vehicles fines worth 125 lakhs collected from 1241 individuals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Pune Traffic Police
  • RTO Office

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.