Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi Special Train : चाकरमान्यांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वे २८ विशेष गाड्या चालवणार, वाचा वेळापत्रक

Holi Special Train News : होळीचा सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईतील चाकरमानी आपल्या गावी येत असतात. १३ मार्चला होळीचा सण असून अनेकांनी रेल्वेचे बुकिंग करण्यास सुरूवात केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 22, 2025 | 05:14 PM
चाकरमान्यांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वे २८ विशेष गाड्या चालवणार, वाचा वेळापत्रक (फोटो सौजन्य-X)

चाकरमान्यांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वे २८ विशेष गाड्या चालवणार, वाचा वेळापत्रक (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Holi Special Train News Marathi: होळी सणासाठी गावी जाणाऱ्या संख्या मोठ्या प्रमाणात असते. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने मुंबईसह राज्यभरातील नागरिक होळीनिमित्त आपलं गाव गाठतात. मात्र, गावी जाताना या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. शिवाय, आगाऊ बुकींग करताना बस आणि ट्रेनच्या तिकीट फूल झाल्यानं या प्रवाशांना निश्चित स्थळ गाठता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं 28 होळी स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी साप्ताहिक विशेष ट्रेन (८ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०२१३९ ही साप्ताहिक विशेष गाडी ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च (रविवार आणि मंगळवार) रोजी सकाळी ००.२० वाजता धावेल आणि त्याच दिवशी १५.१० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०२१४० ही नागपूरहून ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च (रविवार आणि मंगळवार) रात्री ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल.

Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर स्पेशल पॉवर ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, कसं आहे वेळापत्रक?

सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक ०११५१ ही साप्ताहिक विशेष ट्रेन ६ मार्च आणि १३ मार्च (गुरुवार) रोजी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मडगावला पोहोचेल. तसेच ०११५२ साप्ताहिक विशेष गाडी ६ आणि १३ मार्च (गुरुवार) रोजी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.

एलटीटी-मडगाव-एलटीटी साप्ताहिक विशेष ट्रेन (४ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०११२९ ही १३ मार्च आणि २० मार्च (गुरुवार) रोजी एलटीटीहून २२.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, ट्रेन क्रमांक ०११३० ही साप्ताहिक विशेष ट्रेन १४ मार्च आणि २१ मार्च रोजी मडगावहून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबेल.

एलटीटी-हजूर साहिब नांदेड-एलटीटी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक ०११०५ साप्ताहिक विशेष १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी एलटीटीहून ००.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता नांदेडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०११०६ साप्ताहिक विशेष नांदेडहून १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेर, परभणी या स्थानकांवर थांबेल.

पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१४६९ ही साप्ताहिक विशेष गाडी ११.०३.२०२५ आणि १८.०३.२०२५ (मंगळवार) रोजी १५.५० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४७० ही साप्ताहिक विशेष गाडी १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल.

पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१४६७ ही विशेष गाडी १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१४६८ विशेष गाडी १३.०३.२०२५ आणि २०.०३.२०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

बुकिंग कधी सुरू होईल?

०२१३९/०२१४०, ०११५१/०११५२, ०११२९/०११३०, ०४१६९/०४१७०, ०१४६७/०१४६८ आणि ०११०५ या विशेष गाड्यांसाठी बुकिंग २४.०२.२०२५ रोजी सुरू होईल. तुम्ही www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तिकिटे बुक करू शकता.

Mumbai News : मरीन लाईन्स परिसरातील निवासी इमारतीला भीषण, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Web Title: Running of special trains during holi festival 2025 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Holi 2025
  • Indian Railway
  • IRCTC

संबंधित बातम्या

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ
1

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.