मरीन लाईन्स परिसरातील निवासी इमारतीला भीषण, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (फोटो सौजन्य-X)
Fire breaks out at Marine Chambers in Mumbai: दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एका इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२:३० च्या सुमारास आग लागली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग मर्यादित होती. आग लागताच परिसरात घबराट पसरली आणि अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने काम करून आग पसरण्यापासून रोखले आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे ही दिलासादायक बाब आहे, परंतु आगीमागील कारण अद्याप समजलेले नाही. अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत आणि आगीचे कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले की मुंबईतील उंच इमारतींमध्ये मजबूत अग्निसुरक्षा व्यवस्थांची आवश्यकता आहे.
महिनाभरापासून मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. विशेषतः उपनगरातील गोरेगाव येथे महिन्याभरात दोन वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. अशातच आता गोरेगाव पूर्व येथे महिन्याभरात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गोरेगावमध्ये महिन्याभरात दोन वेळा पूर्वेला तर एकदा पश्चिमेला आगीच्या घटना घडल्या आहेत.
गुरुवारी (२० फेब्रुवारी) संध्याकाळी गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटी परिसरात भीषण आग लागली. या आगीत १०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर मोठ्या प्रमाणात शूटिंगचे सामान जळाले असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष नगर परिसराला लागून असलेल्या झोपडपट्टीत भागात ही आग लागली.