Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या पहिल्याच पावसात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले…सामनातून शिंदे सरकारवर निशाणा

शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल, हे सांगता येणे कठीण आहे. असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 27, 2023 | 10:05 AM
मुंबईच्या पहिल्याच पावसात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले…सामनातून शिंदे सरकारवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उशीरानं का होईना मुंबईत पावसाचं आगमन झालं. मुंबईतील उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाली असली तरी या पहिला पावसाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसला आहे. पहिल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली असं म्हणत मुंबईकरांकडून पहिल्याच पावसात संताप व्यक्त झाला. याच मुद्द्याला केंद्रीत करुन आज सामनातून (Saamana) शिंदे सरकारवर (shinde governmen) निशाणा साधण्यात आला आहे.

[read_also content=”काहीतरी हटके! चक्क अंतराळात विश्वचषक ट्रॉफीचं लाँचिंग, बीसीसीआय सचिवांनी शेअर केला व्हिडिओ https://www.navarashtra.com/sports/icc-world-cup-2023-trophy-launched-120000-above-earth-bcci-secretary-jay-shah-tweeted-video-nrps-423497.html”]

नेमकं काय म्हण्टलयं सामनात?

शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल, हे सांगता येणे कठीण आहे. कारण फक्त वल्गना, घोषणा आणि गर्जना यापलीकडे सरकारचे कुठलेच अस्तित्व नाही. पुन्हा त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचे प्रायश्चित्त घेण्याऐवजी ‘पावसाचे स्वागत करा, तक्रारी काय करता?’ असा उफराटा सवाल जनतेलाच करणारे राज्यकर्ते मुंबईकरांच्या बोकांडी बसले आहेत. हा उद्दाम कारभार मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका! असा टोला शिंदे सरकारवर साधण्यात आला आहे.

मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले 

रखडलेल्या मान्सूनने अखेर मुंबईसह महाराष्ट्रात आगमन केले आहे. राज्यात सर्वदूर हातपायदेखील पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी इकडे मुंबईकर मात्र धास्तावला आहे. कारण शनिवारच्या पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत. अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन-तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे. शनिवारी रात्री मुंबईत एका तासात 70 मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले. यावेळी पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असेही वादे मिंधे-फडणवीस सरकारने जोरशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसले. 70 मिलीमीटर पावसामुळे जर मुंबईची ही दशा होत असेल तर पुढील दोन-तीन महिन्यांत आपली काय दुर्दशा होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यात मुंबईकरांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनाच उफराटे सवाल करून धारेवर धरणारे राज्यकर्ते मिंधे सरकारच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत. तुंबलेल्या पाण्यामुळे हवालदिल झालेल्या जनतेला ‘तक्रारी काय करता, पावसाचे स्वागत करा,’ असा म्हणत आहेत.

 

Web Title: Saamana targeting shinde government all claims of shinde government were washed away with mumbai first rain nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2023 | 10:05 AM

Topics:  

  • Shinde government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.