Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज; दररोज 11 हजार मेट्रिक टनांहून…

कारखान्याचे प्रेरक, देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण, संस्थापक आदरणीय पी. डी. पाटील यांच्या विचारांचा व सहकाराच्या मूल्यांचा वारसा जोपासत सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2026 | 11:55 AM
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज

सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज

Follow Us
Follow Us:
  • विस्तारीकरणामुळे कारखान्याची कार्यक्षमता वाढली
  • कारखाना गळीत हंगामासाठी सर्वतोपरी सज्ज
  • दररोज 11 हजार मेट्रिक टनांहून ऊस गाळपाचे नियोजन
मसूर : यशवंतनगर (ता.कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात कारखान्याची प्रतिदिन ७५०० मेट्रिक टनांवरून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत गाळप क्षमता वाढवण्यात यश मिळवले आहे. विस्तारीकरणामुळे कारखान्याची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

कारखान्याचे प्रेरक, देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण, संस्थापक आदरणीय पी. डी. पाटील यांच्या विचारांचा व सहकाराच्या मूल्यांचा वारसा जोपासत सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरू आहे. राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी जोरदार तयारी केली आहे.

Pune PMC Mula Mutha Riverfront : मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

चालू सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात प्रतिदिन ११ हजार मेट्रिक टन व त्याहीपेक्षा अधिक क्षमतेने ऊस गाळप करण्याच्यादृष्टीने ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे. हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी कारखाना प्रशासनाने पूर्ण केली आहे. दरम्यान, ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा, ऊसतोडणीच्या टोळ्या कारखाना कार्यस्थळावर व शेती विभागीय कार्यालयांतर्गत विविध गावांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सर्वतोपरी सज्ज झाला आहे.

कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेला ज्या त्या विभागीय कार्यालयांतर्गत बसविण्याचे काम करतेवेळी यशवंतनगर विभागीय कार्यालय प्रमुख वाय. पी. साबळे, फिल्डमन एम. एच. मोरे, फिल्डमन एस. वाय. पवार, संजय चव्हाण, डी.जी. सरगडे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पाटील, वायदंडे, आतकरे आदी उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेला चांगली परंपरा

सह्याद्री कारखानाच्या सर्वसाधारण सभेला चांगली परंपरा आहे. वार्षिक सभा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात झाली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या श्रद्धांजलीचा ठराव सुरू असताना विरोधकांनी गोंधळास सुरुवात केली. सभेत प्रश्न असतात. खुलासे आपण करतो. या स्थितीत विरोधकांनी बाजार मांडला. या गोंधळात सह्याद्रीच्या सभासदांनी संयम ठेवला. विरोधकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरेच ऐकायची नव्हती तर केवळ नावाप्रमाणेच उत्तुंग चाललेल्या सह्याद्री कारखान्यावर फक्त टीका करायची होती. प्रतिसभा घेऊन प्रक्षोभीत भाषणे करता, अनेक वल्गना करता. त्याला योग्य वेळी उत्तर देऊच.

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Web Title: Sahyadri cooperative sugar factory ready for the crushing season nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 11:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.