Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपघातांचं सत्र आणि पोलिसांच्या वसूलीमुळे समृद्धी महामार्ग बदनाम, कर्मचाऱ्यांचं वेतन न झाल्याने बंद पडलं टोलचं काम

समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या काही दिवसांपासून थकलेलं आहे. काहींचं दोन तर काहींचं चार महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही.

  • By साधना
Updated On: Jun 02, 2023 | 02:45 PM
samruddhi highway toll

samruddhi highway toll

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) 11 डिसेंबरला मोठा गाजावाजा करत उद्घाटन केलं. सुरुवातीला या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा 480 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा रस्ता सुरु करण्यात आला. पण गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे हा महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. आधी अपघातांचं सत्र, त्यानंतर महामार्गावरील पोलिसांची वसुली आणि आता कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने वेळोवेळी टोल बंद केले जात आहेत. गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत तीन वेळा कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने टोल नाका बंद पाडल्याची माहिती मिळाली आहे. तर गुरुवारी (1 जून) रात्री देखील असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यातील जांबरगावाच्या टोल प्लाझावर (Toll Plaza) पाहायला मिळाला.

समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या काही दिवसांपासून थकलेलं आहे. काहींचं दोन तर काहींचं चार महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही. अनेकदा मागणी करुन देखील संबंधित कंपनीकडून वेतन वेळेवर मिळत नसल्याचं टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आणि वेतन मिळत नसल्याने गुरुवारी रात्री 40 पेक्षा अधिक कर्मचारी कामावर न आल्याने टोल प्लाझा बंद पडला. दरम्यान गाड्यांच्या याठिकाणी रांगा लागल्या. शेवटी दुसऱ्या शिफ्टमधील इतर कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं आणि टोल सुरु करण्यात आले. मात्र यासाठी खूप वेळ लागला. विशेष म्हणजे वेतन मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याची ही दीड महिन्यातील तिसरी वेळ आहे.

समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही दिवसांपासून होत नसल्याने संताप व्यक्त होतोय. विशेष म्हणजे यासोबतच टोल प्लाझावर जेवण पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे देखील बिल थकल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनीही टोल प्लाझा बंद पाडला होता. शेवटी पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यानंतर देखील एकदा हाच टोल प्लाझा वेतनाच्या मागणीसाठी बंद करण्यात आला. आता ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे.

समृद्धी महामार्गामुळे कमी वेळेत सुखकर प्रवास करण्याचा हेतू ठेवत सरकारने हा महामार्ग तयार केला. पण आधी अपघातांचं सत्र आणि नंतर जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून पोलिसांची वसुली यामुळे महामार्गाचं नाव बदनाम झालं.

Web Title: Samruddhi highway vaijapur toll plaza closed due to pending salary of workers nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2023 | 02:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Vaijapur

संबंधित बातम्या

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा
1

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक
2

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडणार
3

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडणार

खरीप पिकांचे कंबरडे मोडले! सततच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे
4

खरीप पिकांचे कंबरडे मोडले! सततच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.