
फोटो सौजन्य सोशल मिडिया
याशिवाय विविध प्रकारच्या फटाक्यांचे कॉम्बो पॅकग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. न्यू महाराष्ट्र फटका मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात एकूण १२ फटका मार्केट आहेत. यंदा या मार्केटमध्ये २१८ फटाक्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये अंदाजे १० कोटींहून अधिकचा माल विक्रीसाठी दाखल झाला आहे. या फटाक्यांमध्ये स्टॅण्डर्ड कंपन्यांच्या मालाच्या दरांमध्ये यंदा ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. शहरातील टीव्ही सेंटर, अयोध्यानगरी, कलाग्राम हे तीन प्रमुख फक्त मार्केट आहेत. याशिवाय, एमआयटी, चिकलठाणा, पडेगाव, छावणी, गजानन महाराज मंदिरसहित एकूण १२ फटाका मार्केट यंदा उभारण्यात आले आहेत.
भारत माता फटाका मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज गायके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप फटाक्यांची आवक सुरूच आहे. ५ तारखेपर्यंत अंदाजे ८ ते १० कोटींचे फटाके शहरात विक्रीसाठी दाखल होतील असा अंदाज आहे. हा सर्व माल शिवाकाशी येथून शहरात दाखल होतो. मार्केटमध्ये दुकानेदेखील लागले असल्याचे गायके यांनी म्हटले आहे.
पर्यावरणपूरक फटाक्यांनाही पसंती वाढते. ध्वनी आणि वायुप्रदूषण लक्षात घेता यंदा पर्यावरणपूरक फटाक्यांबाबतही ग्राहकांमध्ये जागरूकता वाढताना दिसत आहे. तुलनेने कमी धूर आणि कमी आवाज करणाऱ्या ग्रीन फटाक्यांना काही ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. मुलांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने फुलबाज्या, अनार आणि रोषणाई करणाऱ्या फटाक्यांकडे पालकांचा कल आहे.
अमरावतीत श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार: मुख्यमंत्री फडणवीस
66 दिवाळीच्या खरेदीला वेग येत असताना फटाका बाजारातही ग्राहकांची गर्दी – वाढण्याची अपेक्षा विक्रेत्यांना आहे, विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर – फटाक्यांच्या विक्रीत मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा २० ते २५ टक्क्यांनी फटाके महाग झाले असले तरी हौशींकडून फटाक्यांची खरेदी होणारच आहे. दुष्काळाचा फटका शहरी भागात दिसून येत नाही.
असे भारत माता फटाका असोसिएशन अध्यक्ष मनोज गायके यांनी सांगितले.
वसू बारसपासून दीपावली सणाला ● सुरुवात होते. यंदा ५ नोव्हेंबर रोजी वसू बारस आहे. याला केवळ एकच दिवस शिल्लक आहे. या अनुषंगाने फटाक्यांच्या किरकोळ खरेदीला सुरुवात झाली असली ५ तारखेपासून खरेदीचा वेग वाढणार आहे.
– गोपाळ कुलकर्णी (अध्यक्ष, न्यू महाराष्ट्र फटाका मार्केट असोसिएशन)
मार्केट
स्टॉल्सची संख्या
अयोध्यानगरी
७०
टीव्ही सेंटर
४०
कलाग्राम
५०
बीड बायपास
२०
छावणी
१०
यासह इतर मार्केट मिळून एकूण २१८ दुकाने सजली आहेत.