Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

Mhada Colony Robbery: भिंतीवरून मारली उडी अन् कटरने कापल्या घराच्या कड्या! छत्रपती संभाजीनगरच्या म्हाडा कॉलनीत एकाच रात्री ६ बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी घातला धुमाकूळ. पिगी बँकेतील पैशांपासून दागिन्यांपर्यंत लांबवले; सीसीटीव्हीत ३ भामटे कैद झाल्याने खळबळ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 05, 2026 | 01:33 PM
Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

Follow Us
Follow Us:
  • म्हाडा कॉलनीत एकाच रात्री ६ घरफोड्या
  • भिंतीवरून आत शिरून कटरने दरवाजाच्या कड्या कापल्या
  • वाळूज पोलिसांकडून सीसीटीव्हीत कैद ३ संशयितांचा शोध सुरू
Mhada Colony Robbery: छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बंद घरांची पाहणी करून हात साफ करणाऱ्या सराईत चोरट्यांनी आता तीसगाव येथील म्हाडा कॉलनी परिसरात जोरदार धुमाकूळ घातला आहे. येथील ‘राज स्वप्नपूर्ती अपार्टमेंट’मध्ये मंगळवारी मध्यरात्री एकाच रात्री तब्बल सहा बंद फ्लॅट आणि रो-हाऊसचे कडे तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भिंतीवरून मारली उडी, कटरने कापल्या दरवाज्याच्या कड्या

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर बाहेरगावी गेलेल्या रहिवाशांची घरे हेरून कटरच्या साहाय्याने दरवाजांच्या कड्या कापल्या. डी-१ इमारतीत राहणारे शानसिंह भाटी हे कुटुंबीयांसह पुण्याला गेले होते. संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून ३ ग्रॅम सोन्याच्या बाळ्या आणि ३ हजार रुपये रोख लांबवले. याच इमारतीतील रिकामा असलेला डी-१०३ क्रमांकाचा फ्लॅटही फोडला, मात्र तिथे काहीही हाती लागले नाही.

हेही वाचा: Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…

पिगी बँक अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास

यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा डी-२ इमारतीतील ११२ क्रमांकाच्या फ्लॅटकडे वळवला. येथे राहणारे अनिल लकारे बाहेरगावी गेलेले असताना, कपाटाचे कुलूप फोडून मुलांच्या बचतीच्या डब्यातील (पिगी बँक) ५ ते ६ हजार रुपये आणि १० ग्रॅमच्या दोन चांदीच्या अंगठ्या पळवल्या. याशिवाय बी-२०३ क्रमांकाचे रो-हाऊस (साठे कुटुंबीय), डी-१ मधील ११४ (जोशी कुटुंबीय) आणि डी-२ मधील १०४ (शेळके कुटुंबीय) या बंद फ्लॅटचेही कडे कापण्यात आले. हे सर्व कुटुंब बाहेर असल्याने चोरीला गेलेल्या ऐवजाचा अचूक अंदाज घरमालक परतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: Jalgaon Anti Corruption: ३ कोटींचे सोने अन् ५ कोटींची संपत्ती; लाचलुचपत विभागाने जळगावच्या अधिकाऱ्याची झडती घेताच उघडकीस आले…

सीसीटीव्हीत ३ चोरटे कैद; पोलिसांकडून शोध सुरू

एकाच अपार्टमेंटमध्ये एकापाठोपाठ एक अशा सहा घरफोडीच्या घटना उघडकीस आल्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन संशयित भामटे कैद झाल्याचे दिसून आले आहे. या फुटेजच्या आधारे वाळूज पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीची ही मोठी घटना कुठे घडली?

    Ans: तीसगाव येथील म्हाडा कॉलनीतील ‘राज स्वप्नपूर्ती अपार्टमेंट’मध्ये एकाच रात्री सहा बंद फ्लॅट आणि रो-हाऊसमध्ये ही घरफोडी झाली.

  • Que: चोरट्यांनी घरफोडी करण्यासाठी कोणती पद्धत वापरली?

    Ans: चोरट्यांनी अपार्टमेंटच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला आणि कटरच्या साहाय्याने बंद घरांच्या दरवाजांच्या कड्या कापून आत प्रवेश केला.

  • Que: पोलिसांना तपासात काय पुरावा मिळाला आहे?

    Ans: एमआयडीसी वाळूज पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात तीन संशयित चोरटे चोरी करताना कैद झाले आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar tisgaon mhada colony mass flat robbery sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • mhada
  • Robbery case

संबंधित बातम्या

Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…
1

Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…

हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी रचला सापळा; पाठलाग करून दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या
2

हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी रचला सापळा; पाठलाग करून दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या

पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी
3

पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!
4

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.