Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

जयभीमनगर येथील टाऊन हॉल कमानीजवळ मध्यरात्री कारमधून आलेल्या सहा जणांनी एका कुटुंबाला अडवून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात छऱ्याच्या पिस्तुलातून केलेल्या गोळीबारात आणि तलवारीच्या हल्ल्यात दोन भाऊ जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2026 | 12:01 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • जयभीमनगरमध्ये मध्यरात्री सहा जणांचा कुटुंबावर हल्ला
  • गोळीबार आणि तलवारीच्या वारात दोन भाऊ जखमी
  • आरोपींनी ‘खून की होली बाकी है’ अशी धमकी दिली
छत्रपती संभाजीनगर : जयभीमनगर येथील टाऊन हॉल कमानीजवळ मध्यरात्री कारमधून आलेल्या सहा जणांनी एका कुटुंबाला अडवून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात छऱ्याच्या पिस्तुलातून केलेल्या गोळीबारात आणि तलवारीच्या हल्ल्यात दोन भाऊ जखमी झाले आहेत. तसेच कुटुंबातील महिलांनाही मारहाण करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी जाताना हा ट्रेलर आहे, अभी खून की होली बाकी है अशी धमकी दिली. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली आहे.

 

शेख वाजीद, शेख समरीन आणि त्यांचे चार साथीदार अशी गोळीबार आणि तलवारीने हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शेख सईद शेख अनिस (२३, रा. जयभिमनगर, टाऊन हॉल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हा कुटुंबीयांसह ३० ऑक्टोबर रोजी रात्री दौलताबाद येथून आसेफिया कॉलनीकडे रिक्षाने आजीच्या घरी जात होता. मध्यरात्री १२.०५ ते १२.३० दरम्यान जयभीमनगर कमानीजवळ रिक्षातील गॅस संपल्याने सर्वजण खाली उतरून पायी निघाले. त्याचवेळी काळ्या रंगाची कार तेथे आली. कारमधून पाच पुरुष आणि एक महिला उतरले. त्यांनी रईस आणि सईद कोण आहे? अशी विचारणा करून कुटुंबीयांना मारहाण सुरू केली. यातील एकाने पिस्तुलातून सईदवर गोळीबार केला. छरे त्याच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

शस्त्रक्रिया करून मांडीतील छरे काढण्यात आले. दुसऱ्या एकाने तलवारीने रईसच्या डाव्या पायाच्या पंजावर वार केला. रईसने हल्लेखोराच्या हातातील तलवार हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी सईदची बहीण सानिया हिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या, तर पत्नी शबनम हिला कारने धडक देण्यात आली. रईसला सोडविण्याच्या प्रयत्नात त्याच्या पायावरही कार घालण्यात आली.

हे सुद्धा वाचा : दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: छत्रपती संभाजीनगरमध्ये कुटुंबावर हल्ला कुठे आणि कधी झाला?

    Ans: ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०५ ते १२.३० च्या दरम्यान जयभीमनगर येथील टाऊन हॉल कमानीजवळ हा हल्ला झाला.

  • Que: या हल्ल्यात किती जण जखमी झाले आणि त्यांच्यावर कशाने हल्ला करण्यात आला?

    Ans: या हल्ल्यात दोन भाऊ जखमी झाले. सईद याच्यावर छऱ्याच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला, तर रईस याच्या डाव्या पायावर तलवारीने वार करण्यात आला.

  • Que: हल्ला करणारे आरोपी कोण आणि त्यांच्याविरोधात काय कारवाई झाली?

    Ans: शेख वाजीद, शेख समरीन आणि त्यांचे चार साथीदार यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident involving an attack on a family has taken place in chhatrapati sambhajinagar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…
1

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…
2

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई
3

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
4

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.