Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Expressway: “शक्तीपीठ महामार्गामुळे ‘या’ परिसराला..”; शेतकऱ्यांनी लिहिली मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र 

राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शक्ती पीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2025 | 09:53 PM
Shaktipeeth Expressway: "शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' परिसराला.."; शेतकऱ्यांनी लिहिली मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र 

Shaktipeeth Expressway: "शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' परिसराला.."; शेतकऱ्यांनी लिहिली मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र 

Follow Us
Close
Follow Us:
सांगली: शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सांगलीवाडीतील  शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहुन मुख्यमंत्र्यांना  पोस्ट कार्ड पाठवली. बाधित शेतकरी सांगलवडीतील राममंदिर चौकात एकत्रीत आले. त्या ठिकाणी एकत्र येवुन अनेक शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले व बोरुने माझी जमिन बागायती असुन, महामार्गासाठी  द्यायची नाही, तसेच या महामर्गामुळे या परिसराला महापुराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपुर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहली.
नांदेड मध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही. असे म्हणुन शक्तिपीठला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहीले नाही. त्यावेळी ते असेही म्हणले की मी सर्व आमदारांशी चर्चा केली आहे. मग सांगलीचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतात. ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. म्हणुन पोस्ट कार्ड लिहण्याचे अवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्तानी पोस्ट कार्ड लिहली.
काय आहे शक्तीपीठ महामार्ग, का होतोय विरोध?

राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शक्ती पीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे. पण या जमिनी पिकाऊ असल्याने राज्यातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जात आहे. यामुळे राजकारण तापण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

हेही वाचा: काय आहे शक्तीपीठ महामार्ग, का होतोय विरोध? : वाचा सविस्तर
काय आहे आहे शक्तीपीठ महामार्ग?

2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडेल. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे देण्यात आलं आहे. राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्स्प्रेसवे असेल. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल. यालाच नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजेच शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखले जाते, हा महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा आणि सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे, हा महामार्ग  नागपूर तसेच गोवा राज्यांना जोडला जाणार असून तो महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे.

हेही वाचा: संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा; संघर्ष समितीचा कडाडून विरोध

इतका खर्च येणार

शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 2025 मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन होणार असून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने १८ तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार आहे.

Web Title: Sangli farmers protest to shaktipeeth expressway flodd alert to sangli latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • Shaktipeeth Expressway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.