mp sanjay raut press confernce on maharashtra Local Government Elections 2025
Sanjay Raut News:“महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपार्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात. महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता. लहान लहान घटना वरून दंग्यांचे भडके उडत आहेत, हल्ले होत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल पुण्याजवळील यवतमध्ये झालेल्या मारहाण आणि जाळपोळीच्या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, “प्रार्थना स्थळांवर, वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक द्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीने समाजात विष पसरवून निवडणुकीला सामोरे जायचे हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय धोरण ठरलं आहे, असा घणाघाती आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, ‘कोणत्या विषयावरती त्याला धार्मिक रंग द्यायचा, खुरापती काढायच्या, महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योग धंदा आणि रोजगारावर, आणि विकासावर होतो.
राजाचे मुख्यमंत्री वारंवार गुंतवणूक वाढल्याचे सांगत आहेत. दौंड हा औद्योगिक पट्टा आहे, तिकडे एमआयडीसी आहे, कारखाने आहेत, उद्योग आहेत, बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या तर त्याला जबाबदार कोण पोलीस काय करत आहेत?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, मंत्री काय करत आहेत कोणाचे राज्य आहे महाराष्ट्रात ही गंभीर गोष्ट आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.
दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषीखाते देण्यात आले आहे. ते म्हणाले की सरळ काम कोणीही करते, कधीतरी वाकडी कामे करावी लागतात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “वाकडी काम करूनच सत्तेवर आले आहेत. ते काही सरळ मार्गाने सत्तेवर आलेले माणसं आहेत का, शरद पवार यांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. ही वाकडी काम करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. खासदार राहुल गांधी, मतांची चोरी झाल्याच दावा सातत्याने करत आहेत, महाराष्ट्रातही तेच झाले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे वाकडी काम करून हे सत्तेवर आले आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
मोठी बातमी; पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक
शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील महत्त्वपूर्ण वाटचाल करणाऱ्या या पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले.स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, कष्टकरी आणि शेतकरी चळवळींमध्ये शेकाप पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक पक्षाच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहणे, ही आमची जबाबदारी आहे, अशी भावना काही नेत्यांनी व्यक्त केली. मुंबईचा लढा असो वा बेळगाव-कारवार सीमावादासारख्या प्रश्नांवरचा संघर्ष – शेकाप पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. आजच्या कार्यक्रमात या संघर्षांची आठवण करून देण्यात आली आणि आगामी वाटचालीबाबत नवे संकल्प करण्यात आले.