Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “भाजपने महाराष्ट्रात निवडणुकीसाठी घोडेबाजार करू नये…; बिनविरोध राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत स्पष्ट बोलले

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच राज्यसभा निवडणूक बिनविरोध होत असल्यामुळे समाधान व्यक्त केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2026 | 11:42 AM
MP Sanjay Raut Press Confernce on rajysabha election marathi news update

MP Sanjay Raut Press Confernce on rajysabha election marathi news update

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
  • राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यावर भाष्य
  • ज्योती वाघमारेंना राज्यसभेच्या संधीवर प्रतिक्रिया
Sanjay Raut PC : मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सात अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामुळे राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) ही बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजपचे चार, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी एक तसेच महाविकास आघाडीकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाकडून प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे. यावर देखील खासदार राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणूक आणि अर्थसंकल्प यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “जर निवडणुकीची गरज नसेल, तर उगाच घोडेबाजार करण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात यापुढे कोणीही घोडेबाजार करू नये, असे माझे मत आहे. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये दोन विधानपरिषद आणि एक राज्यसभा सदस्य निवडून देण्याइतके बळ आहे. पण जर कोणी घोडेबाजार करून राजकारणात पैशाची चटक वाढवत असेल, तर ते राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. निवडणूक बिनविरोध झाली तरी चालेल. आम्ही आणि इतर सहयोगी पक्ष मिळून साधारण 50 च्या आसपास आहोत. त्यामुळे विरोधी पक्ष दोन विधानपरिषद जागा जिंकू शकतो,” असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

पुढे ते म्हणाले की, “सरकार पक्षाकडे सध्या प्रचंड बहुमत आहे. त्यांनी महाराष्ट्रात घोडेबाजार करू नये. दिल्लीतील सरकार घोडेबाजारातून आले असेल, पण महाराष्ट्रात अशी परंपरा वाढवू नये. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे बहुमत आहे. त्यांनी महाराष्ट्रावर भविष्यात घोडेबाजाराचा कलंक लागू देऊ नये,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी देण्य़ात आली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या हायकमांडने काही निवड केली असेल, तर त्यावर मी भाष्य करणार नाही. पण एखाद्या सामान्य कुटुंबातील, दलित-शोषित समाजातील कार्यकर्त्याला महत्त्वाचे पद मिळत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे. आमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला पद मिळत असेल, तर त्याचे स्वागत खुले मनाने केले पाहिजे. तुम्ही ज्योती वाघमारे यांचे नाव घेत आहात. त्या आमच्यावर टीका करतात, अपशब्द वापरतात असे मला लोकांकडून ऐकायला मिळते. ठीक आहे, ती त्यांची संस्कृती किंवा पक्षाचे संस्कार असतील,” असा टोला देखील खासदार राऊत यांनी लगावला आहे.

Web Title: Mp sanjay raut press confernce on rajysabha election marathi news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Rajyasabha Election
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

‘मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करा’; श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश
1

‘मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करा’; श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश

बिनविरोधची धडपड, माघारनाट्य आणि १५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार
2

बिनविरोधची धडपड, माघारनाट्य आणि १५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार

उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप
3

उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप

दिव्यांग खोका प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक; नगराध्यक्षांवरील आराेपांचा केला निषेध
4

दिव्यांग खोका प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक; नगराध्यक्षांवरील आराेपांचा केला निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.