Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

घाईघाईने युद्ध करण्यामागचे एपस्टीने फाईल्सवरच्या लोकांच्या चर्चा बंद व्हाव्यात. यावरचं लक्ष उडावं, युद्धावर चर्चा करावी. एपस्टीन फाईल्स विसरुन जावं म्हणून हे युद्ध असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 11:38 AM
MP Sanjay Raut claim that iran israel war due to divert attention from the Epstein files

MP Sanjay Raut claim that iran israel war due to divert attention from the Epstein files

Follow Us
Follow Us:
  • इराण विरुद्ध अमेरिका व इस्राइलमध्ये युद्धाची ठिणगी
  • एपस्टीन फाईल्सवरुन लक्ष वळवण्यासाठी हे युद्ध
  • खासदार संजय राऊत यांचा दावा
Israel-Iran War:  मुंबई : मध्यपूर्व भागामध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इराण विरुद्ध अमेरिका व इस्राइल (Israel-Iran War) असा संघर्ष निर्माण झाला. क्षेपणास्त्रांचा आणि बॉम्बहल्ला यामुळे आखाती देशांमध्ये युद्ध सुरु झाले आहे. दरम्यान, या युद्धावरुन भारताकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. तसेच दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, एपस्टीन फाईल्सवरुन लक्ष वळवण्यासाठी हे युद्ध सुरु असल्याची टीका खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांनी केली आहे.

 

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच मध्यपूर्व भागामध्ये सुरु असलेल्या युद्धावर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, “एक लक्षात घ्या जेव्हा एखाद्या देशाच्या राष्ट्र प्रमुखाची हत्या होते. तो प्रदीर्घकाळ त्या देशाचं नेतृत्व करतोय. तो कोणताही देश असेल तो देश परंपरेने हिंदुस्थानाचा मित्र आहे. अशावेळी त्या नेत्याच्या हत्येबाबत, मृत्यूबाबत शोक व्यक्त करणं हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार पाळणं गरजेच आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

हे देखील वाचा :५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नेतन्याहूंना, जॉर्डनच्या राजाला फोन करतात सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन यांना फोन करतात. पण ज्या देशावर सर्वात मोठ संकट आहे, ज्या देशावर हल्ला झाला आहे. त्यांचे सुप्रीम लीडर मारले गेलेत. त्यांना फोन करणं त्यांना शोक संवेदना व्यक्त करणं याला आम्ही शिष्टाचार मानतो पाकिस्तानचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या अनेकदा हत्या झाल्या, मृत्यू झाले. ते आपलं शत्रू राष्ट्र आहे. तरीही त्या राष्ट्रात अशा दुर्घटना घडल्यावर या देशाच्या पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केलेल आहे. हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार पाळत नसू तर आपलं परराष्ट्र धोरण माती खातय, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हे देखील वाचा : पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स अधिक महत्वाचे असतील. जसे पृथ्वीराज चव्हाण आमचे आहेत, त्यांनी सुरुवातीला एपस्टीन फाईल्सची माहिती दिली. तेव्हा देशाला माहित नव्हतं एपस्टीन फाईल्स काय आहे?. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला, महाराष्ट्राला अवगत करुन दिलं, अशा प्रकारच्या फाईल्स उघडल्या जातील. त्यात आपल्या देशाच्या नेत्याची नाव असतील सरकार अडचणीत येईल. हे जे युद्ध पुकारलेलं आहे आहे अमेरिकेने इराणविरुद्ध. माझ्या माहितीप्रमाणे घाईघाईने युद्ध करण्यामागचे एपस्टीने फाईल्सवरच्या लोकांच्या चर्चा बंद व्हाव्यात. यावरचं लक्ष उडावं, युद्धावर चर्चा करावी. एपस्टीन फाईल्स विसरुन जावं, म्हणून काही राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन युद्धाचा बार उडवला हे स्पष्ट दिसतंय” अशी शंका खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.

Web Title: Mp sanjay raut claim that iran israel war due to divert attention from the epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Epstein Files
  • Iran-Israel War
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
2

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
3

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
4

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.