Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: ‘बुवाबाजी हेच त्यांचे हिंदुत्व…’; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?

पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत बुवाबाजीला ऊत आला आहे. बुवाबाजी हेच त्यांचे हिंदुत्व बनले आहे. या बुवाबाजीविरुद्ध बोलणारे आणि लिहिणारे ‘सनातन धर्म’ नामक विचारसरणीचे लक्ष्य ठरत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 12, 2025 | 01:26 PM
Sanjay Raut News: ‘बुवाबाजी हेच त्यांचे हिंदुत्व…’; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?
Follow Us
Close
Follow Us:
  • भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात हल्ला
  • हिंदू खतऱ्यात आला असे बोलणे हे माथेफिरूपणाचे लक्षण
  • कडवट हिंदूंचे राज्य भारतावर असतानाही हिंदू पुनः पुन्हा खतऱ्यात असल्याची बोंब

Sanjay Raut News: गेल्या आठवड्यात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामना’त संपाजकीयच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला आहे. दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘देवळांचा धर्म’ आणि ‘धर्माची देवळे’ या पुस्तकाचा संदर्भ देत त्याची निंदा करणारे उच्च दर्जाचे अंधभक्त होते. अशी घणाघाती टीका केली आहे.

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम

“सरन्यायाधीश भूषण गवई आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यामुळे हिंदू खतऱ्यात आला असे बोलणे हे माथेफिरूपणाचे लक्षण मानावे लागेल. हासुद्धा हल्लाच! भूषण गवईंवर हल्ला करू पाहणारे आणि प्रबोधनकारांच्या पुस्तकांना नाकारणारे एकाच प्रतीचे पहिल्या धारेचे अंधभक्त आहेत. काय तर म्हणे, सनातन्यांचे हिंदुत्व धोक्यात आले.”

“पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत बुवाबाजीला ऊत आला आहे. बुवाबाजी हेच त्यांचे हिंदुत्व बनले आहे. या बुवाबाजीविरुद्ध बोलणारे आणि लिहिणारे ‘सनातन धर्म’ नामक विचारसरणीचे लक्ष्य ठरत आहेत. हिंदूंच्या मतावर भाजप निवडणुकांत विजय मिळवत आहे, पण मोदींच्या राजवटीत हिंदूंना उगाच असुरक्षित वाटू लागले. काँग्रेस राज्यात मुसलमानांचे लांगूलचालन सुरू होते. त्यामुळे ‘हिंदू खतरे में’ होता, पण 11 वर्षांपासून कडवट हिंदूंचे राज्य भारतावर असतानाही हिंदू पुनः पुन्हा खतऱ्यात असल्याची बोंब मारली जात आहे.” अशी टीका त्यांनी केली आहे.

”दिल्लीतील स्वामी चैतन्यानंदला आता अटक झाली आहे. आपल्या आश्रमात त्याने अनेक महिलांचे यौन शोषण आणि बलात्कार केले व या सर्व पीडित तरुणींना न्याय देण्यास पोलिसांनी आधी नकार दिला, पण पापाचा घडा भरला. हा स्वामी चैतन्यानंद सरस्वती भारतीय जनता पक्षाचा लाडका प्रचारक होता व स्वामीजी सनातन धर्मावर प्रवचने झोडत होता. या स्वामीवर त्याच्या घाणेरड्या कृत्यांचा जाब विचारण्यासाठी चप्पल फेकावी असे सनातन्यांना का वाटले नाही? आसाराम, रामरहीम, स्वामी नित्यानंद, निर्मल बाबा अशा अनेक सनातनी बाबांचा पर्दाफाश झाला आहे.”

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात!आजीच्या डोळ्यादेखत आठ वर्षीय चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून जागी

” बागेश्वर बाबा हा भाजपचा प्रचारक असून बाबा आपले लहान भाऊ असल्याचे सांगत पंतप्रधान त्याच्या आश्रमात जातात. विज्ञानाच्या कपाळावर खिळा ठोकण्याचा हा प्रयत्न आहे. जातीयवाद व धर्मांधता वाढवून राजकारण करणारे पंतप्रधान या देशाला लाभले आहेत. ते स्वतःस ईश्वरी अवतार असल्याचे समजतात. प्रबोधनकार ठाकरे यांनी याच ढोंगावर प्रहार केले.” असही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

भारतीय जनता पक्ष, संघ परिवाराने सध्या जो धर्म पोसला आहे तो हिंदूंचा खरा धर्मच नव्हे. आजही हा भिक्षुकशाहीचाच धर्म आहे. बुळय़ा, बावळ्या, खुळ्यांना झुलवून एका विशिष्ट वर्गाची तुंबडी भरणारे हे एक पाजी थोतांड असल्याचे परखड मत प्रबोधनकारांनी निर्भीडपणे मांडले, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title: Sanjay raut newshis hindutva is all lies who is sanjay raut targeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Buldhana News: नाना पटोलेंची अवस्था खूप वाईट; आकाश फुंडकरांचा पलटवार
1

Buldhana News: नाना पटोलेंची अवस्था खूप वाईट; आकाश फुंडकरांचा पलटवार

Sanjay Raut PC: दिल्लीचे जोडे उचलणारा मुंबईचा महापौर होणार नाही; संजय राऊतांचा घणाघात
2

Sanjay Raut PC: दिल्लीचे जोडे उचलणारा मुंबईचा महापौर होणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut News: तुम्हाला भीती वाटण्याचं कारण काय….: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यावरुन संजय राऊत
3

Sanjay Raut News: तुम्हाला भीती वाटण्याचं कारण काय….: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यावरुन संजय राऊत

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
4

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.