मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे अमर्याद शक्ती आहे; त्यांच्याकडे पोलिस आहेत, त्यांच्याकडे खूप जास्त लोक आणि संसाधने आहेत, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार करत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास
आमच्या पक्षातील जे लोक जयचंदांसारखे वागले त्यांच्यामुळेच भाजपला फायदा झाला
जपा ‘जयचंद’ निर्माण करून जिंकते
Sanjay Raut on BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार करत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तर गेल्या २५ वर्षांची सत्ता उलथवत ठाकरे गटाचा पराभव केला. या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी या पराभवासाठी अतंर्गत कलह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जयचंद (देशद्रोही) असा उल्लेख करत जबाबदार धरले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल आले आहेत, परंतु आम्ही राज्याची राजधानी मुंबईवर अधिक लक्ष केंद्रित केले. भाजपने आमच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या, म्हणून त्यांचा उमेदवार महापौर होईल. पण आमच्या पक्षातील जे लोक जयचंदांसारखे वागले त्यांच्यामुळेच भाजपला फायदा झाला. जर जयचंद नसते तर भारतीय जनता पक्षाच्या १०० पिढ्याही मुंबईच्या महापौरपदावर विजयी झाल्या नसत्या.” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (BMC Election Result 2026)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या ट्विटबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “भाजपा ‘जयचंद’ निर्माण करून जिंकते. नाहीतर भाजपकडे काय शक्ती आहे? प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात ते प्रत्येक पक्ष फोडून निवडणुका जिंकण्यासाठी ‘जयचंद’ निर्माण करतात. ते शून्याच्या बरोबरीचे आहेत. उपमुख्यमंत्र्यांकडे कोणती शक्ती आहे? जोपर्यंत ते सत्तेत आहेत तोपर्यंत लोक त्यांना सलाम करतील; ज्या दिवशी सत्तेत नसतील त्या दिवशी लोक त्यांच्या वाहनांवर बूट फेकतील.”
बीएमसी निकालांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे अमर्याद शक्ती आहे; त्यांच्याकडे पोलिस आहेत, त्यांच्याकडे खूप जास्त लोक आणि संसाधने आहेत, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे. दुसरा मुख्यमंत्री असता तरी निकाल सारखाच असता. सर्वात मोठी लढाई मुंबईत होती. आपण असे गृहीत धरू नये की भाजपने मुंबईत विजय मिळवला. हा समानतेचा विषय आहे.” (BMC Election Result 2026 )
“मनसेला या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. मला वाटतं त्यांना किमान १५ जागा मिळायला हव्या होत्या. आमचं म्हणाल तर, आम्ही १० ते १५ जागा अत्यंत कमी फरकाने गमावल्या आहेत. बीएमसीमध्ये विरोधक आता सत्ताधारी पक्षाच्या तोडीस तोड आहेत. आमच्या बाजूला १०५ लोक (नगरसेवक व सहयोगी) आहेत. हे १०५ लोक तिथे काय करतील? ते मुंबई विकू शकणार नाहीत, कारण आम्ही तिथे खंबीरपणे उभे आहोत. आम्ही आमचे प्राण गमावले तरी चालतील, पण या कंत्राटदारांचे राज्य आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या हितासाठी आमचा लढा सुरूच राहील,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
Web Title: Sanjay raut on bmc election 2026 the bjp won because of traitors who is sanjay raut targeting