BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?
२०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत ठाकरे गटाने काही जागा गमावल्या असल्या, तरी मुंबईच्या मराठी पट्ट्यातील आपला प्रभाव त्यांनी कायम राखला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर शिंदे यांचीच शिवसेना ही ‘खरी शिवसेना’ असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, महापालिकेच्या निकालातून उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. (Municipal Election Result 2026)
एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी त्यांच्यासोबत आमदारांसह मुंबईतील शिवसेनेचे जवळपस ६२ आजी माजी नगरसेवकदेखील त्यांच्यासोबत गेले. २०१७ च्या निवडणुकीत ठाकरे गटाने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचा आकडा निम्मा कमी होईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपची प्रचंड ताकद आणि शिंदे गटाच्या आव्हानामुळे मराठी मतांचे विभाजन होऊनही ठाकरे गटाने ६५ जागांवर विजय मिळवला.
अस्तित्वाची लढाई जर या ६५ जागांमध्ये मनसेच्या ६ जागांची भर घातली, तर हा आकडा ७१ पर्यंत पोहोचतो. २०१७ च्या ८४ जागांच्या तुलनेत ही घट मोठी असली, तरी पक्षातील मोठी फूट आणि सत्तेचा अभाव पाहता हे यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे. थोडक्यात सांगायचे तर, उद्धव ठाकरेंनी जरी महापालिकेची सत्ता गमावली असली, तरी ६५ जागा जिंकून मुंबईतील आपले राजकीय अस्तित्व आणि “ठाकरे” ब्रँड आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ!
मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांना तिकीटे दिली होती. याशिवाय शिंदेंच्या जोडीला भाजपची भली मोठी ताकदही असल्याने शिंदे गटाच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात होता. पण एकनाथ शिंदे यांना भाजपडून मुंबईत ९० जागा देण्यात आल्या होत्या, त्यातीती ४० ते ५० जागा सहज जिंकून येतील असाही विश्वास होती. पण प्रत्यक्षातं मात्र शिंदे गटाला केवळ २८ जागा मिळाल्या आणि शिंदे गट ३ जागेवर फेकला गेला. भाजपची मतेही शिंदेसेनेला मिळाली नाही. तर भाजपलाही २०१७ च्या महापालिका निवडणुीच्या तुलनेत फक्त सहा जागा जास्त मिळाल्या २०१७ मध्ये भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना ८९ जागांवर विजय मिळाला.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने (भाजप-शिंदे गट) बहुमताचा आकडा पार केला आहे.
पक्ष मिळालेल्या जागा
भारतीय जनता पार्टी (BJP) ८९
शिवसेना (ठाकरे गट) ६५
शिवसेना (एकनाथ शिंदे) २९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २४
एआयएमआयएम (AIMIM) ०८
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ०६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ०३
समाजवादी पार्टी (SP) ०२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ०१
एकूण २२७






