Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसांचे पाहुणे’; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आत्ताचे मोदी सरकार कधीही कोसळू शकते असा दावा राऊत यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 16, 2024 | 01:51 PM
‘नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसांचे पाहुणे’; संजय राऊत यांचा घणाघात
Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणूका पार पडल्याअसून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. स्वबळावर बहुमत मिळवता आले नसले तरी एनडीए आघाडीतील घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापन करण्यात आले आहे. यावेळी चंद्रबाबू नायडू व नीतिश कुमार यांना सोबत घेत हे सरकार स्थापन झाल्यामुळे हे लवकरच कोसळणार असल्याचा दावा इंडिया आघाडीकडून करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी देखील असाच दावा केला असून चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितीश कुमार यांचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे काही दिवसांचे पाहुणे आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे पक्ष फोडून चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाहीत

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला आधी दिल्लीत जाऊ द्या लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल. लोकसभेचे अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितले आहे.चंद्रबाबू नायडू यांचे मी नाव ऐकत आहे ते जर त्यांना लोकसभेचे अध्यक्षपद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि PMहे तेलगू देशम चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितेश कुमार यांचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाही. ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे. आज त्यांच्या टेकूवर हे सरकार उभा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोदींचे नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि आणि जनता द युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

टेकू कधी कोसळू शकतो

पुढे खासदार राऊत म्हणाले,  चंद्राबाबू नायडू यांनी जर त्यांचा उमेदवार उभा केला अध्यक्ष पदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. या देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना झिडकारला आहे, नाकारला आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव केला यांच्या झुंड शाहीचा हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे पारदर्शक पद्धतीने आणि उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने घटनेने विरोधी पक्षाला मिळायला हवे. आता नरेंद्र मोदींचा काय ताम जाम राहिलाय मला सांगा. टेकू वर बसले टेकू कधी कोसळू शकतो राहुल गांधी यांनी सांगितलं आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Web Title: Sanjay raut target bjp says pm narendra modi is a guest for prime minister of india post for few days nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 01:48 PM

Topics:  

  • Chandrababu Naidu
  • MP Sanjay Raut
  • Nitish Kumar
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
3

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
4

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.