मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर ईडीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं उच्च न्यायलयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या जामीनावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.
[read_also content=”माणुसकीला काळीमा फासणारी घटना! उत्तरप्रदेश मध्ये 6 तास दलित व्यक्तीला मारहाण, व्हिडिओचा थरार पाहून आरोपीला अटक https://www.navarashtra.com/india/an-event-that-is-black-for-humanity-dalit-man-beaten-for-6-hours-in-uttar-pradesh-accused-arrested-after-seeing-the-thrill-of-the-video-nrrd-347829.html”]
संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्यानं ईडीनं विरोध केलं होता. त्यामुळे ही ईडीनं ही याचिका दाखल केली आहे. तर पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे पीएमएलए कोर्ट आणि ईडी या दोघांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून यावर आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहण तितकंच महत्त्वाचं आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.