पुणे: पुणेकरांचा निरोप घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजाचीं पालखी रविवारी सायंकाळी दिवे घाट चढून सासवड मुक्कामी पोहचला. या ठिकाणी दोन रात्रीचा विसावा घेऊन आज म्हणजे मंगळवारी (दि. 24) सकाळी सासवडकरांचा निरोप घेऊन साकुर्डे मार्गे जेजुरी येथे मुक्कामी जाणार आहे.
यवतवरून प्रस्थान ठेवत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंडमध्ये
पुण्यातील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरातून रविवारी प्रस्थान ठेवल्यावर हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी असलेली श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोमवारी यवत पालखी तळ (भैरवनाथ मंदिर) येथे रात्रीच्या मुक्कामाला विसावली. तर आज यवतहून हा पालखी सोहळा भांडगाव मार्गे वरवंड येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहचणार आहे.
आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?
“पाऊले चालची पंढरीची वाट” या गाण्याच्या ओळी शाश्वत वाटतात. वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख अनुभवणं आहे. बुधवारीच आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला माहितेय का?
सासवड मध्ये भरला वैष्णवांचा मेळा