Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माऊलींचा पालखी सोहळा आज जिल्ह्यात! जिल्हा प्रशासन सज्ज; वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी (दि. १८) सोलापूर जिल्ह्यातील रावगाव (ता. करमाळा) येथे दाखल होणार असून, प्रशासनाने स्वागताची जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, तात्पुरते दवाखाने आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 08:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

करमाळा (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी (दि. १८) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात दाखल होणार आहे. दुपारी सुमारे २ वाजता पालखी तालुक्यात प्रवेश करेल, तर सायंकाळी ४ वाजता रावगाव येथे पालखीचे आगमन होणार आहे. रावगाव येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी, रविवारी (दि. १९) सकाळी पालखी करमाळा शहरात दाखल होणार आहे.

NCP Politics: पार्थ दादांचे राजकीय करिअर संपवण्याचा कट…! राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रावगाव येथे पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून, पालखीचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने पालखी सोहळ्याकडे विशेष लक्ष दिले असून, सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली रावगाव येथे “संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत” अशा आशयाच्या भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार हेही तयारीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत.

वारकऱ्यांसाठी यंदा विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये मोफत फूट मसाज, मोफत केस कर्तनालय, कपड्यांना मोफत इस्त्री, अन्नदान तसेच चपलांची मोफत दुरुस्ती अशा सेवा देण्यात येणार आहेत. तसेच पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, तात्पुरते दवाखाने, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. रावगाव ग्रामस्थ, करमाळा तहसील प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करत असून, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.

Moshi Garbage Depot Accident: मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत; पहिली रक्कम खात्यात जमा

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील रावगाव (ता. करमाळा) येथे सायंकाळी ४ वाजता आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गावातील मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ही विशेष सजावट केली आहे.

Web Title: Sant nivruttinath maharajs mauli palkhi procession is in the solapur district today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
1

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
2

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
3

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण
4

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.