संतोष देशमुखांच्या लेकीची कमालच; वडिलांच्या मृत्यूनंरही मिळवले बारावीत घवघवीत यश
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज (५ मे) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, राज्याचा एकूण निकाल हा ९१.८८ टक्के लागला आहे. यावर्षी कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला बारावीला ८५.३३ टक्के मिळाल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. देशमुखांच्या कुटुंबावर दुख कोसळलं होतं. तरीदेखील वेभवी देशमुख पास झाल्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येने कुटुंबीय हादरले असतानाच त्यांची कन्या वैभवी देशमुख बारावीची परीक्षा देत होती. त्यामुळे आजच्या या निकालात वैभवी देशमुखला किती मार्क मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबतच आता अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून बारावीच्या परीक्षेत वैभवी देशमुखने 85.33 टक्के इतके मार्क्स मिळवलेत. वडिलांच्या मृत्यूचे आभाळाएवढं दुःख घेऊन वैभवीने परीक्षा दिली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले. या निकालानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विभागनिहाय इयत्ता बारावीचा निकाल
पुणे : ९१.३२ टक्के
कोकण : ९६.७४ टक्के
कोल्हापूर : ९३.६४ टक्के
अमरावती : ९१.४३ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.२४ टक्के
नाशिक : ९१.३१ टक्के
लातूर : ८९.४६ टक्के
नागपूर : ९०.५२ टक्के
मुंबई : ९२.९३ टक्के