स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता 'हा' पक्ष करणार एंट्री; सांगलीच्या जतमध्ये...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार 26 ग्रामपंचायती सरपंच आरक्षण पदाची सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 514 ग्रामपंचायतींवर महिलाराज आले असून, सरपंचपदासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आले. आपल्याला अपेक्षित असलेला आरक्षण न पडल्याने काही इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी पडले तर अपेक्षित आरक्षण मिळाल्याने अनेकांच्या उत्साहाला उधाण आले होते. जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण पदाची सोडत 12 तालुक्यात काढण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या 2025-2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी तालुक्यातील तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. दुपारी तीन वाजता ही सोडत झाली. या सोडतीच्या वेळेस अवघ्या जिल्ह्याचे लक्ष होते. आरक्षण सोडत असल्याने तालुक्याच्या ठिकाणी सकाळपासूनच प्रत्येक गावातील नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. आपल्या गावासाठी कुठले आरक्षण पडते, यासाठी प्रत्येकाची घालमेल सुरू होती. पॅनल प्रमुखसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यातील 608 ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले झाले. त्यापैकी 304 ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे. 138 ग्रामपंचायतीत सरपंचपदी अनुसूची जाती, प्रवर्गासाठी आरक्षण झाले आहे. त्यापैकी 69 ठिकाणी महिला सरपंच येणार आहेत.
सात ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सात ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव ठेवण्यात आले आहे. त्या चार ठिकाणी महिला सरपंच आरक्षण पडले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 273 सरपंच पदे राखीव ठेवले आहेत. त्यातील 107 पदांवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. आजच्या या सोडतीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढण्याचा आरोप करत प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, संबंधितांना आरक्षणाची प्रक्रिया समजून सांगण्यात येत होती तर काहींनी या आरक्षणाला लेखी स्वरूपात अक्षप घेतला.