Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा बसस्थानकाचा कायापालट होणार; पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच सुरुवात

मध्यवर्ती इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावर रँप तयार करण्यात यावा, अशी सूचना सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिली आहे, जेणेकरून वाहनांना आणि अपंग प्रवाशांना अधिक सुलभता मिळेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2025 | 01:05 PM
सातारा बसस्थानकाचा कायापालट होणार; पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच सुरुवात

सातारा बसस्थानकाचा कायापालट होणार; पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा यांची आधुनिक स्वरूपात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीनुसार दोन्ही कामांना शासनस्तरावरून मंजुरी मिळालेली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, सातारा विभागाचे विभाग नियंत्रक विकास माने, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, विभागीय अभियंता प्रियांका काशिद, सातारा आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक रत्नकांत शिंदे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, सुनिल काटकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, सातारा बस स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे बस स्थानक असून, येथे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची व प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकास आत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांची आवश्यकता आहे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बाजूच्या रस्त्यावर रँप तयार करा

मध्यवर्ती इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावर रँप तयार करण्यात यावा, अशी सूचना सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिली आहे, जेणेकरून वाहनांना आणि अपंग प्रवाशांना अधिक सुलभता मिळेल. काम चालू असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे दूरध्वनीद्वारे करण्यात आली आहे. दोन्ही कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

सवलतीच्या दरात तिकीट मिळणार

स्वस्तातील प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उन्हाळी सुट्टीत खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे मे महिन्यात एसटीच्या प्रवासी आरक्षणाचा टक्का वाढला. यंदाच्या मे महिन्यात १२ लाख ३३ हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून एसटी प्रवासाला प्राधान्य दिले. महत्वाचे म्हणजे, ई-शिवाई आणि वातानुकूलित शिवनेरीतून प्रवासाला सर्वाधिक प्रवाशांनी प्राधान्य दिले आहे. विविध योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Web Title: Satara bus stand to be transformed soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • Satara News

संबंधित बातम्या

वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’; सर्वांचे वेधले लक्ष
1

वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’; सर्वांचे वेधले लक्ष

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर
2

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण
3

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.