Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Forest Department: उसाच्या फडात सापडले बिबट्याचे २ बछडे! वन विभागाने घडवली आईशी भेट

Satara News: वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बछडे अवघे सात ते आठ दिवसांचे असून, त्यांना आईपासून कायमचे दूर करणे योग्य नसल्याने वन विभागाने काळजीपूर्वक नियोजन केले. बछड्यांना नैसर्गिकरीत्या मादीच्या स्वाधीन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 12, 2026 | 02:56 PM
Satara News, Leopard Rescue, Koregaon, Forest Department, Wildlife Conservation

Satara News, Leopard Rescue, Koregaon, Forest Department, Wildlife Conservation

Follow Us
Follow Us:
  • ऊसतोडीदरम्यान सापडले दोन बछडे
  • दोन दिवसांची विशेष मोहीम
  • मादीला जेरबंद करून अधिवासात मुक्तता
Satara Forest Department: कोरेगाव तालुक्यातील शहापूर येथे ऊसतोड सुरू असताना उसाच्या फडात सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवण्याचीविशेष मोहीम वन विभागाने फत्ते केली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याच्यामादीला पकडण्यात वन विभागाला यश आले.

शहापूर व परिसरात यापूर्वीही रात्रीच्या वेळी शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अशातच शहापूर परिसरात मशीनच्या साहाय्याने ऊसतोड सुरू असताना उसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बछडे आढळल्याबाबत ऊसतोड कामगारांनी तत्काळ स्थानिक नागरिकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी चंद्रहार जगदाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.

KDMC News: महापालिका मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू; KDMC अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बछडे अवघे सात ते आठ दिवसांचे असून, त्यांना आईपासून कायमचे दूर करणे योग्य नसल्याने वन विभागाने काळजीपूर्वक नियोजन केले. बछड्यांना नैसर्गिकरीत्या मादीच्या स्वाधीन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. बछडे आढळलेल्या परिसरात कॅमेरे लावून बिबट्याच्या मादीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. तसेच मादीला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस विशेष प्रयत्न केले. या मोहिमेला अखेर यश आले असून, बिबट्याच्या मादीला वन विभागाने पकडले. त्यानंतर मादी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

ही कारवाई सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक धैयशील पाटील व सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मोहिमेत कोरेगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशनच्या वनपाल सुरेखा जगदाळे, वनरक्षक सुभाष बडदे, अजय कांबळे, सुनील शेलार, सागर बोडरे, प्रणव माकर आणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Purva Kaushik: आईच्या हातचा फराळ, मित्रांसोबतचा किल्ला अन् फटाक्यांची धमाल; ‘दीपज्योती’च्या ज्योतीने

 

 

Web Title: Satara forest dept reunites two leopard cubs with mother in koregaon as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी
1

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Satara News : पाच हजारांची अग्रिम मदत अंतिम नाही; पंचनाम्यानंतर निकषांनुसार पूर्ण मदत देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
2

Satara News : पाच हजारांची अग्रिम मदत अंतिम नाही; पंचनाम्यानंतर निकषांनुसार पूर्ण मदत देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे! प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ऐतिहासिक प्रवेश दिन उत्साहात साजरा
3

Satara News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे! प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ऐतिहासिक प्रवेश दिन उत्साहात साजरा

दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर खड्डेमुक्त; रस्त्यांच्या कामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
4

दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर खड्डेमुक्त; रस्त्यांच्या कामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.