Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

Ganesh Visarjan Noise Pollution Satara : उदयनराजेंच्या या भूमिकेमुळे डॉल्बीवरील पोलिस कारवाईचा मुद्दा राजकीय चर्चेत आला असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. ध्वनीची मर्यादा शासनाने निश्चित केली असून ती तपासण्यासाठी पोलिसांकडे ध्वनिमापन यंत्रणा आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 26, 2026 | 02:51 PM
Satara News, Udayanraje Bhosale, Shambhuraj Desai, Dolby Crackdown

Satara News, Udayanraje Bhosale, Shambhuraj Desai, Dolby Crackdown

Follow Us
Follow Us:
  • विसर्जनाच्या मिरवणुका संपल्यानंतरही डीजे-डॉल्बीच्या आवाज सुरूच
  • ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी डीजे-डॉल्बी यंत्रणांची तपासणी
  • ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी अनेक डीजे व डॉल्बी साहित्य जप्त
Ganesh Visarjan Noise Pollution Satara : गणेश विसर्जनाच्या मिरवणुका संपल्या; मात्र डीजे-डॉल्बीच्या आवाजाचा राजकीय गजर अद्याप सुरूच आहे. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी व्यावसायिकांची बाजू घेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करत, नियम न मोडताही कारवाई झाली असल्याचे आढळल्यास चौकशी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे डॉल्बीवरील कारवाईला आता राजकीय रंग चढला आहे.

गणेश विसर्जनाच्या काळात सातारा शहरात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी डीजे-डॉल्बी यंत्रणांची तपासणी केली. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळलेल्या काही यंत्रणांवर कारवाई करण्यात आली, तर काही डॉल्बी साहित्य जप्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर डॉल्बी व्यावसायिकांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेत आपली बाजू मांडली.

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या

यावेळी उदयनराजेंनी कारवाईच्या पद्धतीवरच सवाल उपस्थित केला. डॉल्बीचा व्यवसाय करणारे अनेक जण उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करतात. रोजगाराचा दुसरा पर्याय उपलब्ध असता तर त्यांनी हा व्यवसाय केला असता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जप्त करण्यात आलेले डॉल्बी साहित्य सोडविण्यासाठी आपण पोलिस प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदयनराजेंच्या या भूमिकेमुळे डॉल्बीवरील पोलिस कारवाईचा मुद्दा राजकीय चर्चेत आला असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. ध्वनीची मर्यादा शासनाने निश्चित केली असून ती तपासण्यासाठी पोलिसांकडे ध्वनिमापन यंत्रणा आहे. मोजमापात मर्यादेचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाते, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

मात्र, एखाद्या डॉल्बी यंत्रणेने निर्धारित मर्यादा ओलांडली नसतानाही कारवाई झाल्याचे पुराव्यांसह समोर आले, तर विसर्जन मिरवणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल, असेही देसाईंनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘नियमांची अंमलबजावणी की कारवाईतील अतिरेक?’ या मुद्द्यावर आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

कायद्याच्या बाजूने ज्येष्ठांचा मूक संदेश –

दरम्यान, डॉल्बीच्या कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात मूक मोर्चा काढून आपली वेगळी भूमिका मांडली. ज्येष्ठ डॉक्टरांसह नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजासह लेझर लाईटच्या वापरावरही निर्बंध आणण्याची मागणी केली.
ध्वनिप्रदूषणाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना सहन करावा लागतो. उत्सव साजरा करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि कायदेशीर मर्यादांचा विचार होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मोर्चातून मांडण्यात आली.

ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या डीजेवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी पाळल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदनही केले. त्यामुळे एकीकडे डॉल्बी व्यावसायिकांच्या रोजगाराचा मुद्दा राजकीय पातळीवर पुढे आला असताना दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाचा उत्साह ओसरला असला तरी डॉल्बीच्या कारवाईवरून निर्माण झालेला हा वाद आता साताऱ्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Web Title: Satara dj dolby crackdown udayanraje bhosale questions police shambhuraj desai responds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Ganesh Festival 2026
  • Ganesh Visarjan
  • MP Udayanraje Bhosle
  • Satara News

संबंधित बातम्या

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
1

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Pune Ganpati Visarjan : पुण्यात 24 तासांनंतरही गणरायाचे विसर्जन बाकी, अनेक गणेश मंडळ विसर्जनाच्या प्रतिक्षेत
2

Pune Ganpati Visarjan : पुण्यात 24 तासांनंतरही गणरायाचे विसर्जन बाकी, अनेक गणेश मंडळ विसर्जनाच्या प्रतिक्षेत

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
3

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
4

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.