Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २४ सप्टेंबर सकाळी १० ते २६ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत सातारा शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतूक आणि पार्किंगला बंदी असून, सज्जनगड-कासकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 22, 2026 | 10:31 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • सज्जनगड-कासकडे जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग
  • मिरवणूक मार्गावर ‘पार्किंग’ला पूर्ण बंदी
  • नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून, पोलिसांनी तब्बल तीन दिवसांसाठी वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वाहनांची गर्दी होऊ नये आणि भाविकांना सुरक्षितपणे मिरवणूक पाहता यावी, यासाठी अनेक प्रमुख रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत. गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अन्वये याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यानुसार राजपथ, मोती चौक, शनिवार चौक, राधिका टॉकीज चौक, बुधवार नाका तसेच विसर्जन कृत्रिम तलावाकडे जाणाऱ्या मार्गांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.यात प्रमुख असे बदला करण्यात आले आहेत , राजपथ परिसरात वाहतूक बंद : कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक ते मोती चौक तसेच कमानी हौद ते शेटे चौक या मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांना प्रवेश राहणार नाही.

विसर्जन मिरवणूक मार्ग बंद :

शेटे चौक–शनिवार चौक–मोती चौक ते राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका आणि विसर्जन कृत्रिम तलाव या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रतापगंज पेठेतही निर्बंध : काटदरे मसाले दुकान ते डीसीसी बँक, मोती तळे या मार्गावर वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

शाहूपुरीकडील मार्ग बंद :

शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका या मार्गावर वाहतूक बंद राहणार आहे.
अवजड वाहनांना निर्बंध : समर्थ मंदिर ते चांदणी चौक आणि बोगदा–समर्थ मंदिर–शाहू चौक या मार्गांवर हलकी-अवजड वाहने तसेच एसटी बसच्या वाहतुकीवर निर्बंध असतील.

सज्जनगड-कासकडे जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग

सज्जनगड व कासकडे जाणारी वाहने गोडोली नाका, शिवराज पेट्रोलपंप, खिंडवाडी, शेंद्रे-सोनगाव फाटा आणि बोगदा या मार्गाने वळविण्यात येणार आहेत. मोळाचा ओढा येथून सातारा शहरात येणारी वाहने महानुभाव मठ–करंजे–भूविकास बँक चौक मार्गे पुढे सोडण्यात येतील.

कास पुष्प पठारावर शनिवार-रविवारी एकेरी वाहतूक; 31 ऑक्टोबरपर्यंत …

मिरवणूक मार्गावर ‘पार्किंग’ला पूर्ण बंदी

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करता येणार नाही. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी तालीम संघ मैदान, कोटेश्वर मैदान किंवा उपलब्ध पर्यायी पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावावीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना हे वाहतूक निर्बंध लागू राहणार नाहीत.

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० …

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

१. २४ सप्टेंबर सकाळी १० नंतर शहरात येताना पर्यायी मार्गांचा वापर करावा.

२. विसर्जन मार्गावर वाहन पार्क करू नये.
.
३. मिरवणुकीच्या काळात शक्यतो सार्वजनिक वाहतूक किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा.

४. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

५. आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा ठेवावा.

Web Title: Satara ganesh visarjan 2026 traffic restrictions alternative routes parking rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 10:31 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Satara
  • Satara District

संबंधित बातम्या

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
1

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
2

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
3

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन
4

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.