Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ संचालक निवडून आले आहेत. या निकालामुळे बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शंभूराज देसाई यांनी पराभवाची परतफेड केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 03, 2026 | 03:15 PM
जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीचे ८ संचालक!

जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीचे ८ संचालक!

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष
  • नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
  • राष्ट्रवादीचे ८ संचालक
 

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून, जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणातील सत्तासमीकरणांना नवे वळण मिळाले आहे. २१ जागांच्या या निवडणुकीत भाजपने नऊ जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, तर शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या घटक पक्षांचे मिळून १३ संचालक बँकेत पोहोचले आहेत. राष्ट्रवादीला आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, हा निकाल केवळ जागांचा आकडा नसून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची, राजकीय वर्चस्वाची आणि आगामी सत्तासंघर्षाची दिशा ठरवणारा ठरला आहे. (Satara District Bank Election)

सातारा शहरातील जरंडेश्वर नाका येथील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

देसाईंनी पराभवाची परतफेड; पाटणमध्ये ४२ वर्षांनंतर देसाई गटाची बाजी

या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत पाटण तालुक्यात झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा १२ मतांनी पराभव केला. देसाई यांना ५८, तर पाटणकर यांना ४६ मते मिळाली. मागील निवडणुकीतील १४ मतांच्या पराभवाची परतफेड करत देसाईंनी जिल्हा बँकेतील आपले राजकीय वजन पुन्हा सिद्ध केले. तब्बल ४२ वर्षांनंतर देसाई गटाने या मतदारसंघात विजय मिळविल्याने पाटणच्या राजकारणात या निकालाचे विशेष महत्त्व आहे.

Satara Water Management : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे मोठे निर्णय! मंत्री शंभूराज देसाईंचे महत्त्वाचे निर्देश

जयकुमार गोरेंची पुन्हा एन्ट्री; माणमध्ये विरोधकांना धक्का

माण तालुक्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना १४, तर शिवसेनेचे शेखर गोरे यांना सात मते मिळाली. या निकालाने माणमधील गोरे यांच्या राजकीय वर्चस्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. जिल्हा बँकेच्या राजकारणात त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे.

फलटणमध्ये नाईक निंबाळकर कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला

फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सोसायटी मतदारसंघातून विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. या लढतीने फलटणमधील नाईक निंबाळकर कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आणला आहे.

चिठ्ठीने बदलला कौल; सुनील माने यांचे नशिबाने तारले

कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. एका मतपत्रिकेवर आक्षेप घेतल्यानंतर ती बाद करण्यात आली आणि दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ४४ मते मिळाली. अखेर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये सुनील माने यांच्या बाजूने कौल लागल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

कराडमध्ये माजी मंत्री स्व. विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी १०० मते मिळवून धनाजी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. सावली मतदारसंघात भाजपचे ज्ञानदेव रांजणे यांनी ३८ मते मिळवून राष्ट्रवादीच्या विठ्ठल गोळे यांचा पराभव केला. गोळे यांना आठ मते मिळाली. खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले यांनी २८ मते मिळवत भाजपच्या संजीव गाढवे यांचा सात मतांनी पराभव केला.

महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीच्या रूपाली राजपुरे यांनी आठ मते मिळवून शिवसेनेच्या संजय मोरे यांचा चार मतांनी पराभव केला. औद्योगिक विणकर मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी १९ मते मिळवून विजय मिळवला. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक प्रल्हाद चव्हाण यांनी ६१८ मते मिळवली, तर भटक्या-विमुक्त जमाती मतदारसंघातून भाजपचे अर्जुन काळे यांनी ३४९ मते मिळवून अपक्ष सुनील वाघ (२८४ मते) यांचा पराभव केला.

भाजपचे वर्चस्व; मात्र सत्तेचा खरा संघर्ष आता सुरू!

पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. उर्वरित जागांवरील लढतींमध्ये भाजपने चार, राष्ट्रवादीने पाच आणि शिवसेनेने तीन विजय मिळवले. त्यामुळे भाजप नऊ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित आता महायुतीच्या एकजुटीवर अवलंबून राहणार आहे.

या निकालात जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, उदयसिंह उंडाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपापल्या मतदारसंघांतील ताकद दाखवून दिली. दुसरीकडे, राष्ट्रवादीने आठ जागा मिळवत आपले अस्तित्व आणि राजकीय ताकद कायम असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ १३ असले, तरी अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि महत्त्वाच्या समित्यांवरील नियंत्रण मिळवताना नेत्यांमधील अंतर्गत राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत.

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे 

त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला, तरी जिल्हा बँकेतील सत्तेचा खरा सामना आता सुरू होणार आहे. भाजपच्या मोठ्या पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेची साथ कितपत मिळते आणि राष्ट्रवादी विरोधात राहून किती प्रभावी भूमिका बजावते, यावरच आगामी काळातील जिल्हा बँकेच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Web Title: Satara district bank election bjp nine seats ncp eight directors sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला
1

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

IPS Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ
2

IPS Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ

Mumbai News: GNM उमेदवारांचा संताप! ANM ला प्राधान्य, आम्हाला का डावललं?
3

Mumbai News: GNM उमेदवारांचा संताप! ANM ला प्राधान्य, आम्हाला का डावललं?

Yavatmal News: तीन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब! पालकत्वाचे स्वप्न साकार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदेश वितरित
4

Yavatmal News: तीन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब! पालकत्वाचे स्वप्न साकार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदेश वितरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.