Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Nagarpalika News: उदयनराजेंचा कडक इशारा: सातारा पालिकेतील राड्यावर उदयनराजे भोसले संतापले

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाले होते.

  • By anuradha sagar
Updated On: May 19, 2026 | 03:41 PM
Satara Nagarpalika, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosal,

Satara Nagarpalika, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosal,

Follow Us
Follow Us:

Satara Nagarpalika News: सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडलेल्या वादग्रस्त प्रकारानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार गटाच्या नगरसेवकांची तातडीची बैठक घेऊन संबंधितांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सभागृहात झालेली वैयक्तिक स्वरूपाची शेरेबाजी ही अत्यंत निंदनीय असून, पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी असल्याची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाले होते. या घटनेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार गटाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन संबंधितांना समज दिली होती. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदार गटाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन झालेल्या प्रकारावर तीव्र खेद व्यक्त केला.

त्या रात्री नक्की काय घडलं? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, वधूसह 4 जणांवर FIR दाखल

ही बैठक सुमारे दीड तास चालली. यावेळी पक्षप्रतोद निशांत पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता बनकर तसेच खासदार गटातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत बांधकाम सभापतींच्या कार्यपद्धतीबाबत काही नगरसेवकांनी तक्रारी मांडल्या. तसेच पालिकेमधील विविध विकासकामांच्या वाटपाबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बैठकीदरम्यान उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सातारा पालिकेच्या सभागृहाला एक वेगळी परंपरा आहे आणि त्या परंपरेला गालबोट लागेल असे प्रकार पुन्हा घडू नयेत. “आपण कोणत्या गटाचे नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहोत. त्यामुळे कोणीही स्वतःला अमुक गटाचा किंवा तमुक गटाचा समजू नये. आपण सर्व एकाच पक्षाचे नगरसेवक आहोत,” असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.

NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट

नगरसेवकांना काही अडचणी अथवा नाराजी असल्यास त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधून प्रश्न सोडवावेत, तसेच सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी पक्षाची बैठक घेणे बंधनकारक असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले. “स्पर्धा ही विकासकामांमध्ये असावी, वादावादीत नाही,” अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांना सुनावले.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची येत्या शुक्रवारी संयुक्त बैठक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या बैठकीबाबत पक्षाच्या अधिकृत सूत्रांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

 

 

Web Title: Satara municipal corporation politics 2026 udayanraje bhosale meeting satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Udayanraje Bhosale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.