(फोटो सौजन्य: istock)
Parbhani Crime: परभणीत थरार! कोयत्याने सपासप वार; तरुणाचा पंजा मनगटापासून वेगळा
सांगण्यात येत आहे की, या भांडणानंतर वधूच्या ओळखीच्या काही लोकांनी फोन करुन नवरदेवाला त्रास दिला आणि त्याला बदनाम करण्याची धमकी देखील दिली. यामुळेच नवरदेवाने तणावात येऊन स्वत:ला संपवले. सदर घटनेतील मृताचे नाव ओमप्रकाश असल्याचे समोर आले आहे. तो वली मोहम्मद पुर उर्फ लहरपुर इथला रहिवासी होता. घटनेच्या १६ दिवसांनंतर फरिदाबादच्या शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मृताची पत्नी आणि चार अन्य युवकांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
मृताचा भाऊ जयप्रकाश याने दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाशचा विवाह २९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील शेरगढ येथील रहिवासी भूमिका हिच्याशी झाला होता. हिंदू परंपरेनुसार त्यांचे लग्न पार पडले आणि ३० एप्रिल रोजी वधूसह सर्वजण आपल्या घरी परतले. कुटुंबाचा आरोप आहे की, ३० एप्रिलच्या रात्री भूमिका आणि ओमप्रकाश यांच्यात काही गोष्टींवरुन गंभीर वाद झाला. हा वाद इतका पेटला की त्यांचा आवाज खोलीबाहेर येऊ लागला.
तक्रारीनुसार, लग्नाच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मृत ओमप्रकाशच्या फोनवर चार नंबरवरुन सतत काॅल्स येत होते. या चार युवकांच्या नावात जय निषाद, संजीव, नारायण सिंह आणि वेदराम यांचा समावेश असल्याची माहिती आहे. हे सर्व वधूच्या जवळचे आणि ओळखीतले असल्याचे सांगण्यात येत आहे. अज्ञात नंबर्सवरुन फोन काॅल्स येत असल्याने ओमप्रकाश घाबरला होता आणि मानसिकदृष्ट्या तो अस्वस्थ झाला होता. वडिल अशोक यांनी सांगितलं की, भितीने ओमप्रकाशने ही सर्व बाब त्यांना येऊन सांगितली होती. त्यांनी ओमप्रकाशला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण सतत येणाऱ्या त्या फोन काॅल्सने त्याला तणवात टाकलं होतं.
Pune Murder : पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर…
दुसरीकडे जेव्हा वधूची चाैकशी करण्यात आली तेव्हा तिने या सर्व आरोपांना फेटाळून लावलं. तिने म्हटलं की, ओमप्रकाशला फोनवर कुणाचाही काॅल आला नव्हता. तक्रार आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे, जीआरपी पोलिसांनी आता आरोपींविरोधात नावासह एफआयआर दाखल केली असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.






