Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : काळ आलेला पण वेळ नव्हती आली ; स्फोटांच्या मालिकेने हादरला MIDC परिसर

उंब्रज, कराड (वा.) तासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी भीषण आग आणि स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 06:08 PM
Satara News : काळ आलेला पण वेळ नव्हती आली ; स्फोटांच्या मालिकेने हादरला MIDC परिसर
Follow Us
Follow Us:
  • काळ आलेला पण वेळ नव्हती आली
  • स्फोटांच्या मालिकेने हादरला MIDC परिसर
सातारा :  उंब्रज, कराड (वा.) तासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी भीषण आग आणि स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. केमिकल कंपनीत झालेल्या या दुर्घटनेने काही काळ भीतीचे सावट पसरले होते.सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एम्ब्रोजिल बेस’ उत्पादनाशी संबंधित एसकेएस फाईन केम (प्लॉट नं. बी. १/४७) या कंपनीत ही दुर्घटना घडली. कंपनीचे मालक सर्जेराव किसन साळुंखे (रा. उंब्रज, मूळ पाटण) असून व्यवस्थापक सचिन व्यंकटराव मानकर आहेत.

बॉयलर पेटवताना अचानक लागली आग
आदल्या दिवशी केमिकल बॉयलर चार्जिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. सोमवारी सकाळी कंपनी सुरू करताना बॉयलर पेटवण्यात आल्यानंतर अचानक आग लागली. काही क्षणातच उच्च तापमानामुळे केमिकलने भरलेल्या बॅरल्सना स्फोट होऊ लागले. स्फोटांची तीव्रता इतकी होती की तब्बल ५ किलोमीटर अंतरावरूनही आवाज ऐकू येत होता. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व उंब्रजचे पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली, तहसीलदार कल्पना ढवळे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, डीवायएसपी राजश्री पाटील – यांनीही तत्काळ उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल

यंत्रसामग्री, कच्चा माल व तयार माल जळून खाक
दरम्यान, कराड नगरपालिका, सहह्याद्री सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार माल जळून खाक झाला आहे. औद्योगिक वसाहतीत काही काळ भीतीचे वातावरण होते; मात्र वेळेवर कामगार बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांपूर्वी तासवडे एमआयडीसीतील उद्योगांच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारे देण्यात आले होते. तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याच्या आणि प्रत्येक एमआयडीसीमध्ये स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली, हा आत्ता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. खराब वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?

Web Title: Satara news a series of explosions rocked the taswade midc area in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Fire News
  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.