Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

Satara News : उंब्रज येथे पारंपरिक भीम-कुंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलाल-खोबऱ्याची उधळण, फळांचा वर्षाव आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 08:39 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
  • पुत्र भीम आणि ‘कुंती माता’ भेटीचा भावस्पर्शी सोहळा
  • यात्रेला बाजारपेठेचे स्वरूप; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Satara News : भीमसेन महाराज की जय…कुंती माता की जय…’च्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण, गुलाल-खोबऱ्याची उधळण, फळांचा वर्षाव आणि अश्वारूढ रथातून निघालेली भव्य मिरवणूक अशा भक्तिमय वातावरणात उंब्रज (ता. कराड) येथील पारंपरिक भीम-कुंती उत्सव यात्रा मोठ्या उत्साहात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

उंब्रजच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व असलेल्या या उत्सवासाठी सकाळपासूनच भीम मंडप परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकराच्या सुमारास भीम मंडपात कुंती मातेच्या शेजारी अश्वारूढ रथात बसण्याच्या मानासाठी लिलाव पद्धतीने बोली लावण्यात आली. यामध्ये रा. उंब्रज येथील पै. प्रणव प्रल्हाद जाधव यांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावत कुंती मातेच्या शेजारी बसण्याचा मान मिळविला.

Satara Farmer News: महाराजा मल्टीस्टेटमध्ये बनावट सह्या करून फसवणूक? सातारात शेतकरी आक्रमक

अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

दुपारी दोनच्या सुमारास कुंती मातेची अश्वारूढ रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पै. प्रणव जाधव हे कुंती मातेच्या शेजारी रथात विराजमान झाले. भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत मार्गे ही मिरवणूक उंब्रजच्या मुख्य बाजारपेठेत दाखल झाली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी कुंती मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

मिरवणुकीदरम्यान व्यापाऱ्यांनी फळे, तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ताजा भाजीपाला कुंती मातेला अर्पण करून श्रद्धा व्यक्त केली. रस्त्याच्या दुतर्फा महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि बालकांची गर्दी झाली होती. ठिकठिकाणी भाविकांनी फुले व गुलालाची उधळण करीत कुंती मातेचे स्वागत केले. बॅन्जोच्या ठेक्यावर तरुणाईने जल्लोष केला. जयघोष, ढोल-ताशे आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण उंब्रज नगरी उत्सवाच्या रंगात रंगून गेली होती.

पुत्र भीम आणि ‘कुंती माता’ भेटीचा भावस्पर्शी सोहळा

दुपारी चारच्या सुमारास मिरवणूक कॉलेज रोडवरील हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा भीम मंडपाकडे रवाना झाली. सायंकाळी भीम मंडपात ‘पुत्र भीम’ आणि ‘कुंती माता’ यांच्या भेटीचा भावस्पर्शी व अपूर्व सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर भीम मंडपात पुत्र भीमाच्या शेजारी कुंती मातेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘भीमसेन महाराज की जय’ आणि ‘कुंती माता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला.

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

यात्रेला बाजारपेठेचे स्वरूप; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

उत्सवानिमित्त रात्री उशिरापर्यंत भीम मंडपात दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. यात्रेच्या निमित्ताने विविध खाद्यपदार्थांची दुकाने, मेवा-मिठाईची दुकाने तसेच बालचमूसाठी पाळणे आणि विविध मनोरंजनाची साधने यामुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आले होते. परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उंब्रज पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचा जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे यात्रा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Web Title: Satara news bhima kunti festival held in devotional atmosphere a grand procession of mother kunti in a horse drawn chariot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • religion news
  • Satara News
  • Umbraj

संबंधित बातम्या

Satara Farmer News: महाराजा मल्टीस्टेटमध्ये बनावट सह्या करून फसवणूक? सातारात शेतकरी आक्रमक
1

Satara Farmer News: महाराजा मल्टीस्टेटमध्ये बनावट सह्या करून फसवणूक? सातारात शेतकरी आक्रमक

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव
2

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा
3

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
4

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.