Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड तालुक्यातील कांबिरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे 35 गुंठे ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे तब्बल 5 लाखांचे नुकसान

कांबीरे-पाटील यांच्या शेतात आडसाली हंगामातील ८६०३२ जातीचा ऊस गळितास जाण्यास तयार होता. या ऊस क्षेत्रावरून महावितरणच्या वीजतारा गेल्या आहेत. या तारा अधिक लोंबकळत असल्याने एकमेकांना चिकटून शॉर्ट सर्किट झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 20, 2026 | 07:52 AM
कराड तालुक्यातील कांबिरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे 35 गुंठे ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे तब्बल 5 लाखांचे नुकसान

कराड तालुक्यातील कांबिरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे 35 गुंठे ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे तब्बल 5 लाखांचे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • शॉर्ट सर्किटमुळे कांबिरवाडी (ता. कराड) येथे आग
  • वारंवार घटना, तरी उपाययोजना नाही
  • ८६०३२ जातीचा ऊस गळितास जाण्यास होता तयार
मसूर : महावितरणच्या वीजतारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे कांबिरवाडी (ता. कराड) येथील तात्यासाहेब जगन्नाथ कांबीरे-पाटील यांच्या मळवी नावाच्या शिवारातील ३५ गुंठे क्षेत्रातील गळीतास तयार असलेला ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

कांबीरे-पाटील यांच्या शेतात आडसाली हंगामातील ८६०३२ जातीचा ऊस गळितास जाण्यास तयार होता. या ऊस क्षेत्रावरून महावितरणच्या वीजतारा गेल्या आहेत. या तारा अधिक लोंबकळत असल्याने एकमेकांना चिकटून शॉर्ट सर्किट झाले. अन् उसाला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ व युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग वेळीच नियंत्रणात आली. अन्यथा आजूबाजूचा २५ एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले असते.

Mulund Fire : मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

संबंधित वीजतारा धोकादायक स्थितीत असल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा कळवण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महावितरणने या घटनेची तातडीने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा. योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जगन्नाथ पांडुरंग कांबीरे-पाटील यांनी केली आहे.

वारंवार घटना, तरी उपाययोजना नाही

एकाच शिवारात शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळण्याची पुनरावृत्ती झाली आहे. धोकादायक वीजतारांबाबत महावितरणकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना झाली नसल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने वीजतारांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

FAQ :

नेमके काय घडले? कुठे?

– कराड तालुका, कांबिरवाडी (सातारा जिल्हा) – शेतातून गेलेल्या MSEDCL च्या विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट ठिणगी पडून उभ्या ऊस पिकाने पेट घेतला. 35 गुंठे (जवळपास 0.88 एकर) ऊस जळून खाकहा काढणीस आलेला ऊस होता. हा ऊस 12-14 महिने वाढवलेला होता. मात्र, अचानक आग लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळण्याची ही पहिलीच घटना आहे का?

– नाही, महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसात हा 5 वा मोठा प्रकार आहे. 12 ऑक्टो – वाकडी, लातूर – 52 एकर – 22 शेतकऱ्यांचा ऊस – DP च्या शॉर्ट सर्किटने जळाला, अग्निशमन दलाने 4 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली होती.

या हंगामात ऊस दर काय? जळालेल्या ऊसाचे काय होते?

– जळालेला ऊस 24-48 तासात कारखान्यात नेला तर कारखाना घेतो, पण वजन 15-20% कमी, उतारा कमी, त्यामुळे कारखाना 200-400 रु / टन कमी दर देतो. काही कारखाने घेतच नाहीत.

Web Title: 35 gunthas of sugarcane crop reduced to ashes due to short circuit in kambirwadi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 07:39 AM

Topics:  

  • Karad news
  • Satara News

संबंधित बातम्या

निसर्गाचा बळी देऊन विकास नको! डॉ. नीरज हातेकरांचा बावधनमध्ये स्पष्ट संदेश; डीजे-डॉल्बीला फाटा देणाऱ्या २५ गणेश मंडळांचा सन्मान
1

निसर्गाचा बळी देऊन विकास नको! डॉ. नीरज हातेकरांचा बावधनमध्ये स्पष्ट संदेश; डीजे-डॉल्बीला फाटा देणाऱ्या २५ गणेश मंडळांचा सन्मान

Satara News: कोट्यवधींचा कुडाळ पूल बांधूनही पूलावरून एसटी वाहतूक बंदच; ठेकेदारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
2

Satara News: कोट्यवधींचा कुडाळ पूल बांधूनही पूलावरून एसटी वाहतूक बंदच; ठेकेदारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल
3

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी
4

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.