Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Satara News : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लिंब गावच्या हद्दीतील उड्डाण पुलाचा चढ-उताराचा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. खराब सेवा रस्ता, बंद पथदिवे आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या अपघातात प्रशांत बाबासो फरांदे यांचा मृत्यू झाला होता .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 22, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • चढ-उताराच्या रस्त्यावर अपघाताचा धोका
  • सेवा रस्ता खराब; दुचाकीस्वारांचा महामार्गावर वाढला वापर
  • रात्री पथदिवे बंद; सुरक्षेची उपाययोजना तातडीने गरजेची
Satara News : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लिंब गावच्या हद्दीत असलेल्या उड्डाण पुलावरील चढ-उताराचा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

नुकत्याच झालेल्या अपघातात प्रशांत बाबासो फरांदे यांचा मृत्यू झाल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चढ-उताराच्या रस्त्यावर अपघाताचा धोका

लिंब गावच्या हद्दीतील उड्डाण पुलावर चढताना आणि उतरताना वाहनांच्या वेगाचा अंदाज घेणे अनेकदा कठीण होते. पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांची सतत मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक फलक आणि रिफ्लेक्टर लावण्याची मागणी होत आहे. वाहनचालकांना पुढील रस्त्याची स्थिती आणि चढ-उताराचा अंदाज वेळेत यावा, यासाठी योग्य दिशादर्शक व्यवस्था आवश्यक आहे.

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

सेवा रस्ता खराब; दुचाकीस्वारांचा महामार्गावर वाढला वापर

लिंबखिंड ते आनेवाडी टोलनाका दरम्यानचा सेवा रस्ता खराब झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वार महामार्गाचा वापर करत आहेत. परिणामी महामार्गावर चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी गर्दी होत असून, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.

याच मार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणारे प्रशांत बाबासो फरांदे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सेवा रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणीही जोर धरत आहे.

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

रात्री पथदिवे बंद; सुरक्षेची उपाययोजना तातडीने गरजेची

उड्डाण पुलावरील काही पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनचालकांना अंधारात वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी नियमित पाहणी करून रिफ्लेक्टर, सुरक्षा फलक आणि प्रकाशव्यवस्था कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.

रस्ते सुरक्षा आणि वाहतूक विभागाने महामार्गाची नियमित तपासणी करून धोकादायक ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आनेवाडी टोलनाक्यावर वाहनचालकांकडून टोल वसूल केला जात असताना महामार्गावरील सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनीही या मार्गावर वेग मर्यादित ठेवून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Web Title: Satara news limb flyover or accident trap lack of safety measures on the sloped road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Maharastra news
  • Marathi News
  • Road Safety
  • Satara News

संबंधित बातम्या

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
1

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
2

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Hollywood News : हेडन पॅनेटीअरच्या मृत्यूचं गूढ उकललं; फेंटॅनिलसह इतर पदार्थांच्या विषारी परिणामाने मृत्यू
3

Hollywood News : हेडन पॅनेटीअरच्या मृत्यूचं गूढ उकललं; फेंटॅनिलसह इतर पदार्थांच्या विषारी परिणामाने मृत्यू

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
4

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.