Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
राजेंद्र चोरगे, एन. जीवराज परिवाराचे संतोष लुणावत व राजेंद्र लुणावत, नंदकुमार फडतरे, कमला कलाणी, आनंदराव कणसे, नगरसेवक अविनाश कदम व बाळासाहेब खरात यांच्या हस्ते फीत कापून या सुविधेचे उद्घाटन झाले. प्रसाधनगृहात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, चकाचक टाईल्स, २४ तास पाणी, वॉश बेसिन, विद्युत रोषणाई, ध्वनी यंत्रणा तसेच नियमित स्वच्छता व देखभालीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
या उपक्रमासाठी कविता चोरगे, संतोष व राजेंद्र लुणावत, नंदकुमार फडतरे आणि आनंदराव कणसे यांनी आर्थिक सहकार्य केले. स्वच्छता व देखभालीची जबाबदारी नितीन माने यांनी स्वीकारली आहे. यावेळी संतोष लुणावत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नगरसेवक अविनाश कदम यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
‘आम्ही केवळ निमित्त; सातारकरांच्या सहकार्याने २३ वर्षांची सेवा’
“कैलास स्मशानभूमीचे काम गेल्या २३ वर्षांपासून सातारकर नागरिकांच्या सहकार्याने अखंड सुरू आहे. प्रसाधनगृह उभारणीच्या या उपक्रमात आम्ही केवळ निमित्त आहोत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे देणगीदार, सहकारी आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा मिळावी, या उद्देशाने हे काम करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार.”






