Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श ; साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीचा एक आदर्श अनोखा आंतरजातीय विवाह सोहळा सदरबझार येथील कनिष्क मंगल कार्यालयात पार पडला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 02:44 PM
Satara News : फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श ; साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह
Follow Us
Close
Follow Us:
  • फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श
  • साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह
सातारा : महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीचा एक आदर्श अनोखा आंतरजातीय विवाह सोहळा सदरबझार येथील कनिष्क मंगल कार्यालयात पार पडला. महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याने १८४९ साली फेब्रुवारी मध्ये आपला दत्तक मुलगा डॉ. यशवंत याचा राधा ससाने यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला. या तारखेचे औचित्य साधून संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोल्हापूर विभागाचे निवृत्त अधिक्षक अभियंता, रमेश संभाजी इंजे यांची कन्या प्रा. सोनल इंजे व प्रसाद वंदना शहाजी येवले यांनी शासकीय विवाह निबंधक कार्यालयात नोंदणी केली व त्यानंतर सत्यशोधक पद्धतीची शपथ घेऊन अत्यंत साधेपणाने विवाह केला. वधू-वरांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली. स्वागत समारंभास सर्व उपस्थिताना कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अॅनिहिलेशन ऑफ कास्ट चे मराठी भाषणाचे पुस्तक यावेळी देण्यात आले.

वधू-वरांना दिली सत्यशोधक शपथ
डॉ. प्रल्हाद इंजे यांनी या विवाहाचे प्रयोजन सांगून उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. यशपाल बनसोडे यांनी वधू-वरांना सत्यशोधक शपथ दिली. या विधी सोहळ्यास चंद्रमणी बनसोडे यांनी सहकार्य केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदार निवड या उपक्रमातून साकार झालेल्या या विवाहाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

अनुकरणीय सत्यशोधक पद्धतीचा अवलंब केला
नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इंदिरा आठवले-वाघ, औरंगाबाद येथील डॉ. पुष्पा बनसोडे, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सांगलीचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, इंजे, येवले कुटुंबीय, नातेवाईक, निढळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी आदर्श व अनुकरणीय सत्यशोधक पद्धतीचा विवाह केल्याबद्दल नव दाम्पत्यांचे अभिनंदन केले.

Kolhapur News : वणवा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक; शासन स्तरावर ‘वणवामुक्त गाव’ करण्याची होतेय मागणी

अवांतर खर्चाला फाटा देत सेवाभावी संस्थांना मदत
सोनल-प्रसाद या नवविवाहित दाम्पत्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून विवाह सोहळ्यातील अवांतर खर्चाला फाटा देऊन नवी मुंचईतील कचरा वेचक महिलांच्या परिसर सखी विकास संस्थेला वीस हजार व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कराड-कार्वे फाटा येथील महाविहार बांधकामासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली आहे. या युनिक विवाहाच्या स्वागत समारंभास रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी नवविवाहित सोनल प्रसाद या दांपत्याचे व या आंतरजातीय विवाहास संमती देणाऱ्या इंजे व येवले कुटुंबीयाचे अभिनंदन केले.

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

 

Web Title: Satara news taking the role model of phule couple unique truth seeking inter caste marriage in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.