Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: रेशन दुकानदारांचे आर्थिक नुकसान टाळा; POS मशीनचा डेटा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध ठेवा! साताऱ्यात संघटनेची मागणी

रेशन दुकानदारांचे नुकसान टाळण्यासाठी POS मशीनचा डेटा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध ठेवा; सातारा जिल्हा केरोसीन परवानाधारक संघटनेची पुरवठा अधिकाऱ्यांकडे मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 09:40 PM
Satara News: रेशन दुकानदारांचे आर्थिक नुकसान टाळा; POS मशीनचा डेटा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध ठेवा!

Satara News: रेशन दुकानदारांचे आर्थिक नुकसान टाळा; POS मशीनचा डेटा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध ठेवा!

Follow Us
Follow Us:
  • रेशन दुकानदारांचे आर्थिक नुकसान टाळा
  • POS मशीनचा डेटा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध ठेवा!
  • साताऱ्यात संघटनेची मागणी
सातारा: सार्वजनिक वितरण व्यवस्थेत लाभार्थ्यांना अडचणी येऊ नयेत आणि रास्त भाव दुकानदारांचे आर्थिक नुकसान टळावे, यासाठी पीओएस मशीनवरील ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील धान्य वितरणाचा डेटा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध ठेवावा, तसेच दुकानदारांना मिळणारे धान्य नियमानुसार अचूक वजन करूनच देण्यात यावे, अशी मागणी सातारा जिल्हा केरोसीन परवानाधारक संघटनेने केली आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वैशाली राजमाने यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाने सलग तीन महिन्यांचे धान्य एकत्रित वितरित करण्याची योजना राबविल्यामुळे यापूर्वी एप्रिल ते जून २०२६ दरम्यान काही लाभार्थ्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचा अनुभव बैठकीत मांडण्यात आला. संबंधित महिन्याचा डेटा मुदतीपूर्वी बंद झाल्याने अनेक पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले, तर त्याचा रोष रास्त भाव दुकानदारांना सहन करावा लागला, असे संघटनेचे म्हणणे आहे.यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तिन्ही महिन्यांचा डेटा एकाचवेळी उपलब्ध ठेवून तो ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे उशिराने येणाऱ्या लाभार्थ्यांनाही त्यांच्या हक्काचे धान्य मिळू शकेल, असा दावा संघटनेने केला.

Umbraj News: उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

बैठकीत धान्य पुरवठ्याच्या गुणवत्तेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. अनेक वेळा धान्याची पोती फाटलेल्या अवस्थेत किंवा व्यवस्थित शिवलेली नसल्याने वाहतुकीदरम्यान धान्याची गळती होत असल्याची तक्रार करण्यात आली. परिणामी दुकानदारांना कमी वजनाचे धान्य स्वीकारावे लागत असून त्याचा आर्थिक फटका बसत असल्याचे संघटनेने नमूद केले.

शासनाच्या नियमांनुसार प्रत्येक पोते वजन करूनच दुकानदारांच्या ताब्यात देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ही प्रक्रिया काटेकोरपणे होत नसल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक धान्याच्या पोत्याचे वजन करूनच वितरण करावे आणि कमी वजनाच्या तक्रारी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात आली.

शासनाने या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली. बैठकीस जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे, जनरल सेक्रेटरी प्रमोद तपासे, खजिनदार संदीप भणगे यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना व वीज ग्राहक आक्रमक; बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा; अन्यथा १५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन

Web Title: Satara ration shopkeepers pos machine data extension demand marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…
1

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
2

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
3

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
4

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.