Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: जलमंदिरवर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला जलमंदिर पॅलेसवर खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि सुनील काटकर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 17, 2026 | 09:18 PM
जलमंदिरवर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक

जलमंदिरवर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Follow Us
Follow Us:
  • जलमंदिरवर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक
  • विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग
सातारा, दि. 17 (प्रतिनिधी): सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये समन्वय आणि रणनीतीबाबत चर्चा सुरू असून, बुधवारी साताऱ्यातील जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि समन्वय समितीचे प्रमुख सुनील तात्या काटकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांशी संपर्क, मतदान प्रक्रियेतील समन्वय तसेच महायुतीच्या संघटनात्मक बळकटीसंदर्भात बैठकीत विचारविनिमय झाल्याचे समजते.

महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही दिवसांत व्यापक संपर्क मोहीम राबविली आहे. खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे तसेच सुनील तात्या काटकर यांनी विविध स्तरांवर मतदारांशी संवाद साधून महायुतीची भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

Satara News: पाणी द्या, नाहीतर पालिकेला टाळे ठोकू! समाधीचा माळ, गडकर आळीतील महिलांचा पालिकेत संतापाचा स्फोट

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील समन्वय हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे सक्रिय भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

जलमंदिर येथे झालेली ही बैठक निवडणुकीपूर्वीच्या महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक मानली जात असून, मतदानाच्या दिवशी मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच आणि संघटनात्मक व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आल्याची चर्चा आहे. आता उद्याच्या मतदानानंतर येणाऱ्या निकालाकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Satara News : बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन! स्वराज क्रांती संघटनेचा इशारा

Web Title: Satara sangli mlc election mahayuti leaders udayanraje bhosale jaykumar gore meet at jalmandir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • MLC Election
  • Satara
  • Udyanraje bhosale

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
3

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
4

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.